Share

पुन्हा कमबॅक… केंद्रीय मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर नारायण राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला आहे. मोदींच्या कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांवर अधिकच्या खात्यांचा प्रभार होता. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करुन नव्या मंत्र्यांकडे हा कार्यभार दिला आहे. तर, दिग्गज मंत्र्यांकडून कार्यभार काढून घेत त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे.

दरम्यान, भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांचा मोदींच्या कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आलाय. इतकंच नाही तर राणेंचा मंत्रिपदाचा शपथ घेण्याचा पहिला मान देखील देण्यात आला. मराठा समाजातील चेहरा, तसेच येत्या स्थानिक निवडणूका बघता राणेंची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

शपथविधी सोहळ्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री अमित शाह आणि राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मला केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घ्यायला मिळाली. पंतप्रधान मोदी यांचे मी या संधी साठी आभार मानतो. ते जी जबाबदारी देतील ते मी स्वीकारेन. माझा एवढ्या वर्षांचा प्रवास २ वाक्यात सांगू शकत नाही. मात्र, १९८५ साली मुंबई महापालिकेचा नगरसेवक झालो. मग आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, खासदार असा प्रवास मी केला. तसंच, १९९९ साली मुख्यमंत्री झालो, त्यानंतर राजकीय क्षेत्रात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. आता पुन्हा कमबॅक केलंय,’ असं भाष्य नारायण राणे यांनी केलं आहे.

शिवसेना आणि नारायण राणे

शिवसेना आणि राणे घराण्याचे गेल्या काही वर्षांमधील असलेलं वैर हे उभ्या महाराष्ट्राने वेळोवेळी पाहिलं आहे. शिवसेनेपासूनच सुरुवात झालेल्या नारायण राणे यांची नंतरच्या काळात शिवसेनेशीच कटुता झाली. आता त्यांनी शिवसेनेनंतर काँग्रेस मग स्वतःचा पक्ष आणि आता भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास कायमच चर्चेत राहिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!