मुंबई : मुख्यमंत्र्यांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झालेत. याप्रकरणी आता राणे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी सुनावणी होणार आहे. राज्यात विविध ठिकाणी दाखल केलेल्या गुन्ह्यांविरोधात याचिका, दाखल गुन्हे चुकीच्या कलमांखाली दाखल झाल्यानं ते रद्द करावेत, पोलिसांच्या कारवाईला स्थगिती देण्याची राणेंनी याचिकेत प्रमुख मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नारायण राणेंना पोलिसांनी काल २४ ऑगस्ट रोजी अटक केली. त्यानंतर नारायण राणेंना रत्नागिरीतील गोळवली येथून महाड येथे आणण्यात आले. रात्रीच्या सुमारास महाड न्यायालयात नारायण राणेंना हजर करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी नारायण राणे यांची ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी पक्षाने केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर नारायण राणेंना सशर्त जामीन मंजूर केला. राणे यांच्यावर महाडसह पुणे, नाशिक, आणि ठाणे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर आणखीन अडचणी उभ्या राहण्याच्या शक्यता आहेत.
या पार्श्वभूमीवर आज बुधवारी सकाळीच वकिलांची एक टीम राणेंच्या घरी आली होती. या वकिलांनी नारायण राणे यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. राणेंचे वकील आज मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून राणेंवरील सर्व खटले रद्द करण्याची मागणी केली आहे. अॅड. अनिकेत निकम व त्यांचे सहकारी राणेंच्या घरी आले होते. कालच्या याचिकेत राणेंची सही नव्हती. त्यामुळे त्यांची सही घेऊन आज पुन्हा नव्याने याचिका दाखल करण्यात आली आहे. राणेंविरोधात पुणे, नाशिक, महाड आणि ठाणे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे रद्द करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. त्यावर आज दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी सुनावणी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘फक्त राणे नव्हे, तर रावसाहेब दानवेंनेही अशीच भाषा वापरली’, बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
- ‘जीभ ताब्यात ठेवा… शिवसैनिक ठाम आहे’; ठाण्यातील ‘त्या’ पोस्टरची चर्चा
- अनिल परब यांच्याविरोधात भाजप कोर्टात जाणार; चंद्रकांत पाटलांचा इशारा
- ‘भविष्यात पुन्हा असे बोलणार नाही’, नारायण राणेंची कोर्टात ग्वाही
- ‘नारायण राणेंच्या घरात घुसून कोथळा बाहेर काढतो’; शिवसेनेच्या आमदाराची धमकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

