मुंबई : शिवसेना आणि राणे बाप-लेकांचे वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. भाजपा खासदार नारायण राणे यांनी कॉंग्रेसशी हातमिळवणी केल्यापासून शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात कटुता निर्माण झाली आहे. शिवसेनेने राणे यांना गमावून आयता शत्रू निर्माण केला असल्याचे चित्र कित्येक वर्षांपासून महाराष्ट्राने पाहिले आहे. राणे पिता-पुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या नेत्यांवर टीका करण्याची संधी कधीही सोडत नाहीत. नारायण राणे कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आले तरीही राणे यांच्या टीकेपासून शिवसेना बचाव करू शकली नव्हती. भाजपची साथ सोडून शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीशी संसार थाटल्यापासून राणे अधिक आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.
दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी २३, २४, २५ जानेवारी रोजी आझाद मैदान येथे शेतकरी आंदोलन होणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकंदरीतच नव्या कृषी कायद्यांविरोधात ठाकरे सरकार आक्रमक झाल्याचे चित्र आहे. यावरुन भाजपा खासदार नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
‘शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी मोदींनी नवे कृषी कायदे आणले आहेत. हे राजकीय आंदोलन आहे. हेच उद्धव ठाकरे प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून ५० हजार देणार बोलले होते. त्याचं काय झालं? किमान १० हजार तरी द्यावेत. शेतकऱ्यांच्या हिताचं तसंच न्याय देण्याचं कोणतंही काम सध्याचं सरकार करु शकत नाही. कारण यांच्या तिजोरीत पैसा नाही’ अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- बार्शीत ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा अपेक्षाभंग तर अपक्ष आमदाराचा करिष्मा !
- राज्य सरकारने राणेंची सुरक्षा काढून घेतली, मोदी सरकारने 12 कमांडोजची सुरक्षा पुरवली
- मराठा उमेदवारांची ‘ती’ नियुक्ती रद्द करण्यासाठी एमपीएससीची सर्वोच्च न्यायालयात धाव !
- सलाम : दुर्घटनेत पत्नी गमावली, स्वतः जबर जखमी झाले मात्र रुग्णालयातही श्रीपाद नाईक ‘ऑन ड्युटी’
- ‘महाविद्यालये सुरु करण्याबाबत शिक्षण खातं आणि मुख्यमंत्री यांच्यात कुठलाही समन्वय नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

