बार्शी : बार्शीचे माजी आमदार दिलीप सोपल यांनी ऐन निवडणुकीच्या बहरात शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या प्रवेशामुळे बार्शीत शिवसेनेला ‘अच्छे दिन’ येतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पण, विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांनी अपक्ष निवडणूक लढवून देखील दणदणीत विजय मिळविला होता. बार्शीत शिवसेनेचे काम करणारे भाऊसाहेब आंधळकर, भाजपचे काम करणारे राजेंद्र मिरगणे आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत हाती शिवबंधन बांधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सोपल या तिघांच्या आव्हानांचा ‘सामना’ करत राऊत यांनी बार्शी विधानसभा मतदार संघावर आपली विजयी पताका फडकवला आहे.
महाराष्ट्रात इतर ठिकाणी शिवसेना आणि भाजप मध्ये युती धर्म पाळण्यावरून वाद विवाद सुरु होते. मात्र, बार्शीत भाजप नेते राजेंद्र मिरगने यांनी युती धर्म निभावत शिवसेनेचे उमेदवार दिलीप सोपल यांना सहकार्य केले होते. माजी मंत्री दिलीप सोपल हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे जुने सहकारी होते.
सोपल यांनी पक्ष पराभवाच्या छायेत असताना ऐनवेळी पवार यांची साथ सोडली होती. त्यामुळे सोपल यांचा पक्षत्याग पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. सोपल सोडून गेल्यानंतर बार्शीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अस्तित्व धूसर झाले असतानाही शरद पवार यांनी निवडणुकीत आपला उमेदवार उभा केला होता. निरंजन भूमकर या युवा कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून त्यांच्यासाठी बार्शीत जाहीर सभा घेतली होती.
एकीकडे राष्ट्रवादी पक्षाची तर दुसरीकडे शिवसेना पक्षाची ताकद असणारे उमेदवार असतानाही राऊत यांनी विधानसभा निवडणुकीत विजय खेचून आणला. इथून पुढच्याही स्थानिक निवडणुकांमध्ये राउत अशाच विजयाची परंपरा कायम ठेवणार या कडे सर्व जिल्याचे लक्ष लागले होते. आताच पार पडलेल्या बार्शी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निकालांचे विश्लेषण केले तर विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांचा जलवा कायम असल्याचे स्पष्ट दिसते.
बार्शी तालुक्यात एकूण ७८ ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. त्यात राऊत गटाने सर्वार्वाधिक जागा जिंकत आपली सत्ता राखली आहे. ‘आमच्या गटाला ७८ पैकी ५१ ग्रामपंचायतींवर सत्ता मिळाली आहे. तर बिनविरोधसह ७२ ग्रामपंचायती आमच्या ताब्यात आल्या आहेत’ अशी प्रतिक्रिया आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली आहे. अपक्ष निवडून आलेल्या राऊत यांनी भाजपला पाठींबा दिला आहे. त्यामुळे बार्शीतील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा विजय झाला असे म्हणता येईल.
महत्वाच्या बातम्या
- ‘शरद पवारांचा शेतकरी आंदोलनातील सहभाग म्हणजे निव्वळ ढोंगीपणा !’
- मराठा आरक्षणासाठी आगळेवेगळे आंदोलन
- मराठा उमेदवारांची ‘ती’ नियुक्ती रद्द करण्यासाठी एमपीएससीची सर्वोच्च न्यायालयात धाव !
- अडीच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या उद्योगपती जॅक मा यांच्याबाबत मोठी बातमी; वृत्तवाहिनीने पोस्ट केला व्हिडीओ
- चेन्नई सुपर किंग्जसोबतचा माझा प्रवास संपला; दिग्गज खेळाडूचं भावनिक ट्विट !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
