🕒 1 min read
मुंबई : कर्नाटकातील अंकोला तालुक्यातील होसाकंबी गावातून प्रवास करत असताना केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात झाला होता. आठवड्याभरापूर्वी ते यल्लपुराहून गोकर्ण येथे प्रवास करत असताना त्यांची गाडी पलटल्याने हा अपघात झाला. या अपघातात श्रीपाद नाईक यांच्यासह इतर तिघेजण गंभीर जखमी झाले. श्रीपाद नाईक बचावले, मात्र यामध्ये दुर्दैवाने श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक व त्यांच्या जवळच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला होता.
श्रीपाद नाईक हे सद्या रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयात दाखल असताना देखील त्यांनी आपल्या विभागाच्या निगडित कामांना थांबवलेलं नाही. त्यांचा एक फोटो सद्या व्हायरल होत आहे. यात त्यांच्यावर उपचार असताना देखील ते काम करत असल्याचे दिसून येत आहे. हा फोटो व्हायरल होताच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भाजपचे नेते निलेश राणे यांनी देखील ट्विट करून त्यांच्या या कार्याला सलाम केला आहे. ‘आपल्या कर्तव्याशी कसं एकनिष्ठ असावं ह्यांचे उत्तर. श्रीपाद नाईकजी यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला त्यात त्यांनी त्यांच्या पत्नींना सुध्दा गमावले पण ते आपल्या कर्तव्यापासून दूर गेले नाहीत. तब्येत ठिक नाही तरी ते काम करत आहेत. श्रीपाद नाईकजी यांचा अभिमान वाटतो.’ असं ट्विट करून निलेश राणे यांनी त्यांच्या कार्याला अभिवादन केलं आहे.
आपल्या कर्तव्याशी कसं एकनिष्ठ असावं ह्यांचे उत्तर. श्रीपाद नाईकजी यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला त्यात त्यांनी त्यांच्या पत्नींना सुध्दा गमावले पण ते आपल्या कर्तव्यापासून दूर गेले नाहीत. तब्येत ठिक नाही तरी ते काम करत आहेत. श्रीपाद नाईकजी यांचा अभिमान वाटतो. pic.twitter.com/iaaBLusVf8
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 20, 2021
महत्वाच्या बातम्या
- बार्शीत ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा अपेक्षाभंग तर अपक्ष आमदाराचा करिष्मा !
- राज्य सरकारने राणेंची सुरक्षा काढून घेतली, मोदी सरकारने 12 कमांडोजची सुरक्षा पुरवली
- मराठा उमेदवारांची ‘ती’ नियुक्ती रद्द करण्यासाठी एमपीएससीची सर्वोच्च न्यायालयात धाव !
- ‘बाळासाहेबांचे पुत्र मुख्यमंत्री असताना औरंगाबादचं संभाजीनगर होत नाही हे दुर्दैव आहे’
- ‘महाविद्यालये सुरु करण्याबाबत शिक्षण खातं आणि मुख्यमंत्री यांच्यात कुठलाही समन्वय नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
