मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील सुरु आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांनी केंद्राकडे बोट केलं असून विरोधी नेते मात्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, राज्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठा करावा, हवाईमार्गाद्वारे इतर राज्यातून ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा, हाफकिन संस्थेमध्ये कोरोना प्रतिबंधक लस निर्माण करण्यास मान्यता द्यावी, कर्जाची हप्ते वसुली थांबवावी, गरीब-गरजूंसाठी आर्थिक मदत घोषित करावी, आदी मागण्या केल्या आहेत.
दरम्यान, ‘राज्य सरकारने केलेल्या मागणी प्रमाणे केंद्राने रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात थांबवली, हाफकिनला लस निर्मिती करण्याची मान्यता दिली असे सर्वच निर्णय केंद्र सरकार करत आहे. हे फक्त मागणी करत आहेत. उद्धव ठाकरे मृत्यूची आणि बाधितांची घोषणा करतात पण आरोग्य व्यवस्थेसाठी काहीच करत नाही. मुख्यमंत्री आहेत ना मग महाराष्ट्रासाठी निर्णय घ्या,’ असं म्हणत भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
‘उद्या यांच्या घरात दोन वेळच्या जेवणासाठी देखील केंद्राला पत्र लिहून मागणी करतील, आमच्या घरासाठी दोन वेळच्या जेवणाची मदत करा. राज्य चालवण्यासाठी पैसा जमा करण्याचं काम घटनेनं राज्य सरकारला दिलं आहे. जरा राज्यघटना वाचा. नुसतं मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करताय?’ असा घणाघात राणेंनी केला आहे.
- अनिल परब सेवाभावी मंत्री; सेवा आणि मेवा कुठे जातो याची चौकशी व्हावी ! – राणे
- पालघर प्रकरणातील साधूंना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही – कदम
- मुख्यमंत्री फार सौम्य आहेत, त्यांनी कठोर पावलं उचलली पाहिजे – संजय राऊत
- मला हाफकिनचे सामर्थ्य माहित आहे; जितेंद्र आव्हाडांनी मानले पंतप्रधानांचे आभार !
- ‘कालपर्यंत मुली उचलून आणण्याची भाषा वापरणारे आज साधूंसाठी आंदोलन करतायत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

