नाशिक: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते नाशिक येथे आयटी परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. राणे म्हणाले की, राजकारण आणि उद्योग वेगळे ठेवले तर रिझल्ट मिळतो. माझ्या पक्षाचे लोक आल्यानंतर त्यांचे काम करायचे हे माझे काम, असं ते यावेळी म्हणाले. तसेच यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
नारायण राणे यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हणाले, तुमची मंत्रालयातली खुर्ची हलत आहे. किती तरी मंत्री जेलमध्ये जाण्यासाठी वेटिंगवर आहेत, असा इशारा देखील नारायण राणे यांनी दिला आहे.
पुढे बोलताना राणे म्हणाले की, कोकणात यांना एन्रॉन नको आहे. मात्र, मात्र सगळे कॉन्ट्रॅक्टचे काम शिवसेनेच्या लोकांनी घेतले. नाणारला विरोध केला. सगळ्या जमिनी शिवसैनिकांनी घेतल्या. याला शिवसेना म्हणतात. विमानतळासाठी आंदोलन केले. योगायोगाने सत्ता तीन पक्षाची आली. खरे तर विरोध आयटी पार्कला नाही. राणेला आहे. जिथे जिथे राणे जातात तिथे शिवसेना विरोध करते, असं राणे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Russia -Ukraine War: युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी आता भारतीय वायुदल मैदानात
“नवाब मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय भाजप शांत बसणार नाही”, चंद्रकांत पाटलांचा इशारा
‘डर्टी डजनची यादी घोषित केली आहे, चिठ्ठी काढायचा अधिकार मुख्यमंत्र्यांना’; किरीट सोमय्यांचा टोला
Russia vs Ukraine war: कीव्ह शहर त्वरित सोडण्याचे भारतीय दूतावासाचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

