🕒 1 min read
नवी दिल्ली : सध्या युरोप खंडातील युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये युद्ध चालू आहे. युक्रेनने NATO मध्ये सहभागी होऊ नये याकरता रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आक्रमक पवित्रा अवलंबविला आहे. रशियाचे लष्कर हे जगातील सर्वात ताकदवान लष्करापैकी एक आहे. त्यामानाने युक्रेनचे लष्कर एवढे ताकदवान नाही.
रशियाचे लष्कर आता युक्रेनदेशाची राजधानी कीव्ह जवळ आले आहे. काल आणि आज रशियाच्या लष्कराने युक्रेनची राजधानी असणाऱ्या कीव्हवर जोरदार मिसाईल हल्ले केले आहेत. त्यातच आज रशियाच्या लष्कराने युक्रेनमधील जगातील सर्वात मोठे विमान उद्ध्वस्त केले आहे. अवकाशातून उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी 1980 मध्ये हे विमान विकसित केले गेले होते. परंतु युक्रेन रशियामधून वेगळे झाल्यावर या विमानाचा मालवाहतूक विमान म्हणून उपयोग करण्यात आला होता. अँटोनोव्ह An-225 मरीया (Antonov An-225 Mriya) असे या जगातील सर्वात मोठ्या विमानाचे नाव आहे.
रशियाच्या लष्कराने ‘दोस्तोमेल’ विमानतळावर ताबा मिळवल्यावर हे जगातील सर्वात मोठे विमान उध्वस्त केले आहे. परंतु हेच जगातील सर्वात मोठे विमान पुन्हा बांधण्याचा निर्धार युक्रेन सरकारने बोलून दाखवला आहे. Antonov An-225 Mriya हे एक सुपरहेवी वाहतूक विमान होते. या विमानातून मोठा प्रमाणात माल आणि मनुष्य वाहतूक सहजरित्या होत असे. मात्र आक्रमक रशियाच्या लष्करासमोर हे जगातील सर्वात मोठे विमान काहीच क्षणात उध्वस्त झाले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Russia -Ukraine War: युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी आता भारतीय वायुदल मैदानात
- Russia Ukraine War : रशियाच्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
- ‘दाऊदचा माणूस पवारांना चालतो’; निलेश राणेंचा गंभीर आरोप
- ‘बाळासाहेबांनी मुंबई वाचवण्यासाठी काम केले, त्यांचे चिरंजीव मात्र…’; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल
- VIDEO : युझीने उडवली सिराजच्या अतरंगी हेअरस्टाईलची मज्जा ; व्हिडिओ होतोय व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
