सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा कालावधीत जिल्ह्याला राज्य शासनाकडून वाढीव निधी देणे आवश्यक होते; मात्र तसे न करता राज्य सरकार जिल्ह्याला प्राप्त निधी मागे घेत आहे. कमी निधीमध्ये विकास कसा होणार, असे सांगत हे सरकार राज्य चालविण्यास अपयशी ठरल्याचा आरोप खासदार नारायण राणे यांनी केला आहे.
बीड जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे तात्काळ भरा, .प्रितम मुंडे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा तत्काळ सर्व्हे करावा आणि कोरोना कालावधीत गावपातळीवर काम करणाऱ्या सरपंचांना तातडीने निधी द्यावा, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राणे यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे भेट घेत चर्चा केली. यावेळी आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, राजेंद्र म्हापसेकर, सावी लोके, माधुरी बांदेकर, शारदा कांबळे, प्रमोद जठार, अतुल काळसेकर आदी उपस्थित होते.
‘सोनूने लोकांना घरी पोहचवले तुम्ही गरिबाला एका पैशाची अजून मदत केली नाही’
“जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ते सर्व मुंबईतील आहेत. आरोग्य यंत्रणा रुग्णांवर उपचार करायला कमी पडत आहे. कोरोनावर उपचार करायला हवे तसे उपचार जिल्हा रुग्णालयात केले जात नाहीत. कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक त्या सुविधा दिल्या जात नाहीत. त्यांचे हाल होत असल्याच्या तक्रारी त्यांचे नातेवाईक करत आहेत. याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. शासनाने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शासनाकडे करणार आहे.” असंही नारायण राणे म्हणाले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

