मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपावर जोरदार टीका केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून आज भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं.
यावेळी नारायण राणेंनी शिवसेनेने प्रितीश नंदींना १९९८ साली राज्यसभेची खासदारकी दिल्याची आठवण सांगितली. त्यावेळी संजय राऊतांनी कशा प्रकारे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली होती, याविषयी नारायण राणेंनी सांगितलं.
प्रितीश नंदींना पहिल्यांदा खासदारकी मिळाली तेव्हा दिल्लीला मनोहर जोशींनी राऊतांना कमिटमेंट दिली होती की आता एक खासदारकी आली. त्यानंतर तुम्हाला देणार. पण राऊतांना न देता प्रितीश नंदीला खासदारकी दिली. तेव्हा संजय राऊत म्हणाले होते ‘मला उमेदवारी मिळाली नाही तर साहेबांचे आणि उद्धव ठाकरेंचे कपडे उतरवीन. मी यांना रस्त्यावर आणीन’. माझ्याकडे साक्षीदार आहेत. कोणत्याही क्षणी पत्रकारांसमोर आणेन. तुमची लायकी आहे का साहेबांबद्दल बोलायची?, असा सवाल नारायण राणेंनी संजय राऊतांना विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या:
“…तेव्हा बरेच लोक बेरोजगार होतील”; नारायण राणेंच्या आरोपांवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
‘लाव रे तो व्हिडीओ’; शिवसेनेचे नारायण राणेंना जोरदार प्रत्युत्तर
IPL 2022 : जाणून घ्या का ट्रेंड होतोय “boycott chennai super king”
‘ईडी’वर बोलू नका नाहीतर ‘विडी’ प्यायला लावतील; नारायण राणेंचा संजय राऊतांना खोचक सल्ला
IPL 2022: श्रेयस अय्यर असेल आगामी हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार


