मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्रकार परिषदेनंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, शिवसेनेनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन ‘लाव रे तो व्हिडीओ’च्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेना नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी किरीट सोमय्यांचा जुना व्हिडीओ दाखवला. त्यामध्ये किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सध्याचे भाजप नेते नारायण राणे यांच्यावर शंभर बोगस कंपन्या असल्याचा आरोप केला होता. ईडी चौकशीला घाबरूनच नारायण राणे भाजपमध्ये गेल्याचा आरोपही त्यांनी केला. दुसऱ्या एका व्हिडीओत नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे एनडीएचे खोटारडा उमेदवार असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केल्याचं दिसत आहे.
किरीट सोमय्यांनी नारायण राणेंवर केलल्या आरोपांचे काय झाले याबाबत ईडीकडे चौकशी करणार असल्याचंही विनायक राऊत यांनी सांगितलं. राजन तेलींनी नितेश राणेंवर केलेल्या आरोपाचा एक जुना व्हिडीओही यावेळी शिवसेनेने शेअर केला आहे. नारायण राणेंचे जुने व्हिडीओ असेच टप्प्याटप्याने लावणार असल्याचंही विनायक राऊतांनी स्पष्ट केलं.
महत्वाच्या बातम्या:
‘ईडी’वर बोलू नका नाहीतर ‘विडी’ प्यायला लावतील; नारायण राणेंचा संजय राऊतांना खोचक सल्ला
IPL 2022: श्रेयस अय्यर असेल आगामी हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार
‘ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी नवीन संघटनेची होणार घोषणा’; विजय वडेट्टीवारांची माहिती
‘आमंत्रण जेवणाचं अन् ताटात आला वडापाव’; सदाभाऊ खोतांचा राऊतांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

