मुंबई : सध्या राज्यात आरोप- प्रत्यारोपांचे राजकारण पाहायला मिळत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून ठाकरे कुटुंबावर व संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. काल (मंगळवार) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या आरोपांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान आता विरोधक राऊतांवर टीका करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवर खोचक टीका केली.
“संजय राऊतांवर फक्त एक आरोप झाला तर घाम फुटतोय, अजून बरच काही निघायचं आहे. ‘ईडी’वर बोलू नका नाहीतर ‘विडी’ प्यायला लावतील, आपली कुवत कुठे, मी कुणाला घाबरत नाही, असे राऊत म्हणतात. शिवसेनेच्या जन्मानंतर २६ वर्षानंतर संजय राऊत आले. शिवसेना बांधताना आम्ही पैसे गोळा केले. आम्ही ऐवढं केलं म्हणून आता सत्ता आहे. राऊतांचे शिवसेना भवनाच्या उभारणीत तुमचे ५ पैसे तरी आहेत का?”, असा सवाल नारायन राणे यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांना हटवण्याची संजय राऊतांना सुपारी मिळाली आहे
नारायण राणे म्हणाले, “संजय राऊतांच लक्ष उद्धव ठाकरे जीथे बसले आहेत त्या खुर्चीवर आहे. हे शिवसेनेचे नाहीत, पुर्ण राष्ट्रवादीचे आहे. संजय राऊतांना सुपारी मिळाली आहे, यांना (उद्धव ठाकरे) हटव आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो. कारण मुख्यमंत्र्याच नाव जाहीर होणार होत, त्याच्या आधल्या रात्री उद्धव ठाकरे शरद पवारांना भेटायला गेले होते. त्यावेळी संजय राऊत आणि आदित्य त्यांच्याबरोबर होते.”
राणे म्हणाले, “तुम्हाला मी आज ओळखतो का? तुमची स्वार्थी प्रवृत्ती आहे. तुमची पुर्ण कुंडली माझ्याकडे आहे. देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत आहात. तुमच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध डिस्पोजल केससबद्दल, झालेल्या व्यवहाराबद्दल, तुमच्यापेक्षा मला माहित आहे. ते आदित्यने केलेले असो, वा अन्य कुणी ते सर्व व्यवहार माझ्याकडे आहेत.”
ईडीच्या अधिकाऱ्यांवर संजय राऊत यांनी काल आरोप केले. यावर नारायण राणे म्हणाले, “ईडीच्या अधिकाऱ्याने ३०० कोटी घेतल्याचा आरोप राऊतांनी केला. ईडी अधिकाऱ्यांनी गप्प बसू नये, संजय राऊतांना उचलून न्यावे, थोडी पुजा करावी आणि पुरावे मागावे. नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर टीका करताय, तुमची काय लायकी आहे, तुम्ही कुठे आहात?”
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 : मुूंबई इंडियन्सला मिळणार आनंदाची बातमी? जोफ्रा आर्चरविषयी इंग्लंड बोर्ड घेऊ शकतं ‘असा’ निर्णय!
- ‘नाटकातली घोडी अन् नौटंकी थाट’; आढळराव पाटलांची अमोल कोल्हेंवर टीका
- शाकिब अल हसन ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिल्यानंतर पत्नीचे टीकाकारांना सडेतोड उत्तर
- “…तर होय! आम्ही भ्रष्टाचार केला”; खासदार उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंवर जोरदार पलटवार
- भाजपचे माजी नगरसेवक रवींद्र इथापे यांनी घेतली शरद पवारांची भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

