मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेना खासदार संजय राऊतांवर खोचक टीका केली. तसेच राऊत यांनी काल (मंगळवार) भाजपवर केलेल्या आरोपांना राणे यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांना हटवण्याची संजय राऊतांना सुपारी मिळाली आहे, ते राष्ट्रवादीचे आहेत, त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा आहे, असा आरोप राणे यांनी केला. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, “मी प्रखर राष्ट्रवादी आहे आणि राष्ट्रभक्त आहे. तसेच आमचा कुठे डोळा नसतो. आमचा फक्त महाराष्ट्र आणि देशात शिवसेनेच्या विस्तारावर डोळा आहे. २०२४ पर्यंत शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहचली असेल. तेव्हा बरेच लोक बेरोजगार होतील.
काय म्हणाले होते नारायण राणे?
नारायण राणे म्हणाले, “संजय राऊतांच लक्ष उद्धव ठाकरे जीथे बसले आहेत त्या खुर्चीवर आहे. हे शिवसेनेचे नाहीत, पुर्ण राष्ट्रवादीचे आहे. संजय राऊतांना सुपारी मिळाली आहे, यांना (उद्धव ठाकरे) हटव आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो. कारण मुख्यमंत्र्याच नाव जाहीर होणार होत, त्याच्या आधल्या रात्री उद्धव ठाकरे शरद पवारांना भेटायला गेले होते. त्यावेळी संजय राऊत आणि आदित्य त्यांच्याबरोबर होते.”
राणे म्हणाले, “तुम्हाला मी आज ओळखतो का? तुमची स्वार्थी प्रवृत्ती आहे. तुमची पुर्ण कुंडली माझ्याकडे आहे. देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत आहात. तुमच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध डिस्पोजल केससबद्दल, झालेल्या व्यवहाराबद्दल, तुमच्यापेक्षा मला माहित आहे. ते आदित्यने केलेले असो, वा अन्य कुणी ते सर्व व्यवहार माझ्याकडे आहेत.”
ईडीच्या अधिकाऱ्यांवर संजय राऊत यांनी काल आरोप केले. यावर नारायण राणे म्हणाले, “ईडीच्या अधिकाऱ्याने ३०० कोटी घेतल्याचा आरोप राऊतांनी केला. ईडी अधिकाऱ्यांनी गप्प बसू नये, संजय राऊतांना उचलून न्यावे, थोडी पुजा करावी आणि पुरावे मागावे. नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर टीका करताय, तुमची काय लायकी आहे, तुम्ही कुठे आहात?”
महत्वाच्या बातम्या :
- ‘ईडी’वर बोलू नका नाहीतर ‘विडी’ प्यायला लावतील; नारायण राणेंचा संजय राऊतांना खोचक सल्ला
- IPL 2022: श्रेयस अय्यर असेल आगामी हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार
- ‘ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी नवीन संघटनेची होणार घोषणा’; विजय वडेट्टीवारांची माहिती
- ‘ऋषभ ऑक्शननंतर मला सॉरी म्हणाला..’; आवेश खानचा खुलासा
- ‘आमंत्रण जेवणाचं अन् ताटात आला वडापाव’; सदाभाऊ खोतांचा राऊतांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

