मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. शरद पवार यांचा उद्या १२ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार सुधीर भोंगळे यांनी लिहिलेल्या पवारांच्या मोजक्या भाषणांचा संग्रह असलेले पुस्तक ‘नेमकचि बोलणे’ या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पवार यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. या कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर टीका केली.
भाजपला देशाचे ऐक्य नको हे शरद पवार यांनी २५ वर्षापूर्वी सांगितलं होतं, आम्हाला २ वर्षापूर्वी कळलं. आम्हाला हे कळालं आहे की भाजप देशाला किती मागे नेतोय हे त्यांनी १९९६ च्या आसपास सांगितलं होतं, असे संजय राऊत आज झालेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये म्हणाले आहेत. याबाबत नारायण राणेंना विचारले असता त्यांनी संजय राऊतांवर खोचक टीका केली आहे.
संजय राऊत नेमके कोणत्या पक्षाचे आहेत हेच समजत नाही. राष्ट्रवादीचे आहेत शरद पवार त्यांचे नेते आहेत की, शिवसेनेत आहेत उद्धव ठाकरे त्यांचे नेते आहेत हेच कळत नाही. संजय राऊत दिल्लीमध्ये शरद पवारांच्याच कार्यालयामध्ये असतात. पक्षाशी प्रामाणिक नाहीत, निष्ठा नाही. ते फक्त आव आणायचे काम करतात. ते दाखवतात तसे नाहीत, असे नारायण राणे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले आहेत.
संजय राऊत जे बोलतात ते कोणत्याही वृत्तपत्राचाच संपादक अशा भाषेत बोलू शकत नाही. जी भाषा मार्गदर्शक नाही, विकासात्मक नाही, प्रबोधन करणारी नाही. जे केले ते सांगा. कधी होते शिवसेनेत आणि शिवसेनेत काय केले? लावालावी करायचं काम त्याच नाव संजय राऊत, अशा शब्दात नारायण राणे यांनी संजय राऊतांवर आगपाखड केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ते’ कळायला इतके वर्षे लागले तर खरा चू**; निलेश राणेंची जहरी टिका
- एमआयएमची ‘तिरंगा रॅली’ मुंबई वेशीवरच रोखणार; पोलिसांचा कडक बंदोबस्त
- आता बस्स..! नागा चैतन्यला घटस्फोट देण्यावर समांथाची प्रतिक्रिया
- नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा; चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी


