मुंबई : राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. त्यावरुन राज्याच्या राजकारणात मोठा वाद सुरु आहे. ओबीसी आरक्षणावरुन आता भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
नाना पटोले हे महाराष्ट्र काँग्रेसचे आतापर्यंतचे सर्वात हतबल प्रदेशाध्यक्ष राहिलेत. दोन मंत्र्यांच्या दबावात त्यांनी नागपूर विधान परिषदेचा उमेदवार काँग्रेसने बदलला. त्यामुळं नाना पटोले यांनी आजच्या आज आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी चंद्रशेखर बानकुळे यांनी केली आहे.
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला हवा. कारण ते आता हतबल झाले असून काँग्रेसला न्याय देऊ शकणार नाही. 2 मंत्र्यांच्या दबावाखाली येऊन महाराष्ट्र काँग्रेसला आपला निर्णय बदलावा लागला हे अत्यंत लाजिरवाणे चित्र आहे. काँग्रेसच्याच दोन मंत्र्यांनी दबाव टाकल्याने नाना पटोलेंनी उमेदवार बदलला. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. पक्षाच्या मंत्र्यांवरच त्यांचे नियंत्रण नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
इंम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी दिलेले 5 कोटी हे तूटपुंजी आहे. 405 कोटींचा प्रस्ताव असताना 5 कोटी देणे ही शर्मेची बाब आहे. निवडणुका पुढे ढकला एका महिन्यात डेटा गोळा करणे शक्य आहे. सरकारने तोंडाला पाने पुसली आहेत. हे सरकार झोपलेले आहे, अशी टीकाही यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘शरद पवारांच्या विचारांना भगवं कव्हर घातलं, अवघा रंग एक झाला’
- शरद पवारांनी सांगितला नावं लक्षात ठेवयाचा भन्नाट किस्सा, म्हणाले…
- …ही महाराष्ट्र काँग्रेसच्या इतिहासातील सर्वात वाईट घटना- चंद्रशेखर बावनकुळे
- ‘हे बाळ त्याचं नाही तर…’ ; कॉमेडियन भारती सिंहने केला खुलासा
- ‘भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका सहज जिंकेल’


