मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. शरद पवार यांचा उद्या १२ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार सुधीर भोंगळे यांनी लिहिलेल्या पवारांच्या मोजक्या भाषणांचा संग्रह असलेले पुस्तक ‘नेमकचि बोलणे’ या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पवार यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
या कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी भाजपवर निशाणा साधला होता. संजय राऊत म्हणाले, भाजपला देशाचे ऐक्य नको हे शरद पवार यांनी २५ वर्षापूर्वी सांगितलं होतं, आम्हाला २ वर्षापूर्वी कळलं. आम्हाला हे कळालं आहे की भाजप देशाला किती मागे नेतोय हे त्यांनी १९९६ च्या आसपास सांगितलं होतं. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी यावर जहरी टीका केली आहे.
पवार साहेब 25 वर्ष जे बोलले ते संजयला दोन वर्षापुर्वी कळू लागले, कळायला इतकी वर्ष लागली तर मग खरा चू.. संज्या निघाला… स्वा. बाळासाहेब असते तर संज्याला ढुंगणावर लाथ मारून हाकलून दिला असता कारण 25 वर्ष बाळासाहेबांच्या विचारांना काही अर्थ नव्हता असं म्हणायचं आहे संज्याला.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 11, 2021
निलेश राणे यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. पवार साहेब २५ वर्ष जे बोलले ते संजयला दोन वर्षापुर्वी कळू लागले, कळायला इतकी वर्ष लागली तर मग खरा चू.. संज्या निघाला… स्व. बाळासाहेब असते तर संज्याला ढुंगणावर लाथ मारून हाकलून दिला असता कारण २५ वर्ष बाळासाहेबांच्या विचारांना काही अर्थ नव्हता असं म्हणायचं आहे संज्याला, अशा शब्दांमध्ये राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या:
- एमआयएमची ‘तिरंगा रॅली’ मुंबई वेशीवरच रोखणार; पोलिसांचा कडक बंदोबस्त
- आता बस्स..! नागा चैतन्यला घटस्फोट देण्यावर समांथाची प्रतिक्रिया
- नवाब मलिकांचा आता थेट ईडीलाच सवाल; म्हणाले ईडीने काय आता…
- दक्षिण आफ्रिका दौरा ‘या’ तीन वरिष्ठ खेळाडूंसाठी ठरू शकतो शेवटचा!
- उर्वशीने माजी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना ‘भगवद गीता’ दिली भेट; ते म्हणाले ‘सब शानदार..’


