पुणे : एकीकडे राज्यात सध्या नगरपंचायती आणि महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. असे असतानाच दुसरीकडे ओबीसी आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे आहेत. भाजपच्या साथीने चालणारे रासपचे नेते महादेव जानकर आता महाविकास आघाडी सरकारचे कौतुक करायला लागले आहेत. हे पाहून राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महादेव जानकरांनी भाजप आणि काँग्रेसवर निशाणाही साधला आहे, तसेच त्यांनी स्वबळाचा नाराही दिला आहे. महादेव जानकरांनी आज पुण्यात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यामुळे आगामी निवडणुकीत पुण्यात रासपही निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. ओबीसी आरक्षणावरून महादेव जानकर यांनी काँग्रेस आणि भाजपवर थेट आरोप केला आहे.
ओबीसींना आरक्षण मिळू द्यायचं नाही ही काँग्रेस आणि भाजपची भूमिका आहे. काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, ओबीसी आरक्षणासाठी मी रस्त्यावर उतरणार, असा इशारा महादेव जानकरांनी दिला आहे.
कोरोना काळात राज्य सरकारचं काम चांगलं आहे, असे वक्तव्य महादेव जानकरांनी केल्याने महाविकास आघाडीबरोबर जाण्याच्या तयारीत आहेत का? असे अनेक तर्क वितर्क सुरू झाले आहेत. आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र महादेव जानकरांनी स्वबळाचा नारा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज ‘या’ रोडवर ‘नो व्हेईकल झोन
- जिल्हा बँकेचा निकाल लागताच राणे समर्थकांनी पुन्हा म्याव म्याव करत सेनेला डिवचलं
- जिल्हा बँक निवडणुकीच्या विजयानंतर गायब असलेल्या नितेश राणेची पोस्ट
- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपने निर्विवाद विजय मिळवला-चंद्रकांत पाटील
- सिंधदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया


