Share

सुशांत प्रकरणी एक दिवस आदित्य ठाकरे तुरुंगात जाणार आहे- नारायण राणे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- काल शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. राज्यात सत्ता आल्यानंतरचा आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच दसरा मेळाव्यात जनतेशी संवाद साधला. राज्यातली महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या गोष्टी काहीजण करत आहेत. त्यासाठी तारीख पे तारीख देत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी सरकार पाडून दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं.

दरम्यान, आज मी मुख्यमंत्रीपदाचा मास्क बाजूला ठेवलाय. ज्याला कुणाला खुमखुमी आली असेल तर त्यांनी आजमावून पाहा. तुम्ही जर आमच्या वाटेला आलात तर तुम्हाला धडा शिकवला जाईल असा इशारा देखील विरोधकांना काल ठाकरे यांनी दिला. मुंबई, बिहार ते दिल्ली अशा सर्वच ठिकाणी उभ्या राहिलेल्या बाहुल्या, रावणी, काळी टोपी आणि बेडकी अशा उपमा देत विरोधकांना त्यांनी अक्षरशः सोलून काढले.

दरम्यान, ठाकरे यांनी केलेल्या भाजपवरील टिकेलाच उत्तर देण्यासाठी माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांनी खास पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलतांना राणे म्हणाले की ‘ उद्धव ठाकरे म्हणजे शिवराळ भाषेत काहीही बरळणारं व्यक्तिमत्व आहे,अशा खरमरीत शब्दात टीका केली.

बीबीसी मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, उद्धव ठाकरेंनी या वेळचा दसरा मेळावा मुलाला क्लिनचिट देण्यासाठी घेतल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. सुशांत सिंह राजपूतची प्रकरणी आदित्य ठाकरे कोठडीत जाईल, सत्तेचा दुरुपयोग करून स्वत:च्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न आहे. सुशांतच्या प्रकरणात त्याला मारलं, कशानं मारलं सर्व बाहेर येईल. दिशा सालियनवर बलात्कार कुणी केली, तिला वरून कुणी टाकलं, हे सर्व समोर येईल,असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केला आहे.

दरम्यान, मी राज्यसभेचा खासदार आहे आणि संजय राऊत देखील त्याच सभागृहाचा खासदार आहे.पण त्याला कळत काय ? अहो तिकडं काय घडतं हे याला आम्ही सांगतो आणि हा सामनात अग्रलेख लिहून काहीही मांडणी करतो, संजय राऊत हा काय माणूस हे ! काय बोलतो,कसं बोलतो,हे खरच वेगळचं आहे या शब्दात माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी संजय राऊत यांना चांगलेच सुनावले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!