मुंबई:मी राज्यसभेचा खासदार आहे आणि संजय राऊत देखील त्याच सभागृहाचा खासदार आहे.पण त्याला कळत काय ? अहो तिकडं काय घडतं हे याला आम्ही सांगतो आणि हा सामनात अग्रलेख लिहून काहीही मांडणी करतो, संजय राऊत हा काय माणूस हे ! काय बोलतो,कसं बोलतो,हे खरच वेगळचं आहे या शब्दात माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी संजय राऊत यांना चांगलेच सुनावले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेना कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी आयोजित दसरा मेळाव्यात बोलतांना नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही सुपुत्रांवर सडकून टीका केली होती.त्या टिकेलाच उत्तर देण्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी खास पत्रकार परिषद घेतली.
त्यावेळी पुढे बोलतांना राणे म्हणाले की ‘ उद्धव ठाकरे म्हणजे शिवराळ भाषेत काहीही बरळणारं व्यक्तिमत्व आहे.या उद्धवची लायकी नाही नरेंद्र मोदींबद्दल बोलण्याची कारण तुम्ही ५६ आमदारांच्या पाठींब्यावर आज मुख्यमंत्री झालात ते फक्त मोदी साहेबांच्या आशीर्वादामुळे त्यामुळे काहीही बोलत बसू नका.
उद्धव ठाकरे म्हणजे पुळचट माणूस आहे.आज बाळासाहेब ठाकरे असते तर या माणसाला साहेबांनी मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं.आणि हा काय बाता मारतो.मी जर माझं तोंड उघडलं तर मुख्यमंत्री पद तर सोड नुसता पळत फिरशील,त्याचबरोबर बाळासाहेबांच्या डोळ्यात पाणी आणणारा हा नालायक हा काय आम्हाला शिकवणार असही राणे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला तुमची लाज वाटायला हवी,कंगनाचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
- ‘श्रावणबाळ’आदित्य ठाकरे दिनोच्या घरी संध्याकाळी तुळशीपूजेला जातो का? : नितेश राणे
- तुम्ही काय‘श्रावणबाळ’ जन्माला घातलाय का?; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
- अहो,हे सरकार कधी पडेल हे उद्धव ठाकरे यांना सुद्धा कळणार नाही : रामदास आठवले
- ‘आम्ही फावड्याचे असे केले हाल,एक झाला पेंग्विन आणि दुसरा जंगलातली पाल!’

