नवी दिल्ली- नवी दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयाने कोळसा मंत्रालयाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलिप रे यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. वीस वर्षांपूर्वीच्या झारखंडमधील कोळसाखाण घोटाळ्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
झारखंड कोळसा विभागातील तथाकथित अनियमितता आणि घोटाळ्यासंबंधी हे प्रकरण आहे. दिलीप रे हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये कोळसा राज्यमंत्री होते. विशेष म्हणजे दिलीप रे यांना काही दिवसांपूर्वीच कोळसा घोटाळासंबंधी एका प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले होते.
सन 1999 साली झारखंडच्या कोळसा विभागातील तथाकथिक अनियमितता आणि घोटाळाप्रकरणी न्यायालयानेही ही शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश भरत पराशर यांनी दिलीप रे यांना भ्रष्टाचार अधिनियम अंतर्गत दोषी करार दिला आहे. तर, इतर दोघांना फसवणूक आणि कट रचण्याच्या हेतुने दोषी ठरवले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला तुमची लाज वाटायला हवी,कंगनाचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
- ‘श्रावणबाळ’आदित्य ठाकरे दिनोच्या घरी संध्याकाळी तुळशीपूजेला जातो का? : नितेश राणे
- तुम्ही काय‘श्रावणबाळ’ जन्माला घातलाय का?; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
- अहो,हे सरकार कधी पडेल हे उद्धव ठाकरे यांना सुद्धा कळणार नाही : रामदास आठवले
- आरपीआयच्या माध्यमातून आता मी देशासाठी काम करेन : पायल घोष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

