🕒 1 min read
मुंबई- काल शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. राज्यात सत्ता आल्यानंतरचा आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच दसरा मेळाव्यात जनतेशी संवाद साधला. राज्यातली महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या गोष्टी काहीजण करत आहेत. त्यासाठी तारीख पे तारीख देत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी सरकार पाडून दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं.
दरम्यान, आज मी मुख्यमंत्रीपदाचा मास्क बाजूला ठेवलाय. ज्याला कुणाला खुमखुमी आली असेल तर त्यांनी आजमावून पाहा. तुम्ही जर आमच्या वाटेला आलात तर तुम्हाला धडा शिकवला जाईल असा इशारा देखील विरोधकांना काल ठाकरे यांनी दिला.मुंबई, बिहार ते दिल्ली अशा सर्वच ठिकाणी उभ्या राहिलेल्या बाहुल्या, रावणी, काळी टोपी आणि बेडकी अशा सर्वांनाच त्यांनी अक्षरशः सोलून काढले.
आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी भाजपा नेते आणि खासदार नारायण राणे व त्यांच्या दोन्ही पुत्रांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. ठाकरेंनी नाव न घेता, राणेंना बेडुकाची उपमा दिली. शिवसेनाचा दसरा मेळावा कोणाला टार्गेट करण्यासाठी नाही. पण काही जणांना इंजेक्शन देणे गरजेचे असते ते आम्ही देतो. बेडके किती ही फुगले तरीही ते वाघ होत नाहीत, तुम्हाला माहिती आहे, एक बेडूक आणि त्याची दोन पोरं या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतात. या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला, त्यांनी बाबांना सांगितलं, असा टोला उद्धव ठाकरेंनी राणे पिता-पुत्रांना लगावला.
दुसऱ्यांची 'पिल्ल' वाईट..
मग यांनी काय त्या DINO च्या खुशित नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा "श्रवणबाळ" जन्माला घातला आहे का?
इतकी खुम खुमी आहे ना मग ती Disha Salain ची केस मुंबई पुलिस वर कुठला ही दबाव न टाकता निपक्षपाती चौकशी करुन दया..
मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!— Nitesh Rane (@NiteshNRane) October 25, 2020
त्यानंतर, राणे बंधुंनी शिवसेनेवर प्रहार केलाय.“दुसऱ्यांची ‘पिल्ल’ वाईट. मग यांनी काय त्या दिनोच्या खुशीत नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा “श्रवणबाळ” जन्माला घातला आहे का? इतकी खुमखुमी आहे ना मग ती Disha Salainची केस मुंबई पोलिसांवर कुठला ही दबाव न टाकता निःपक्षपाती चौकशी करुन दया. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!,” असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- बेडके किती ही फुगले तरीही ते वाघ होत नाहीत,राणे पितापुत्रांवर ठाकरेंची टीका
- हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, ठाकरेंनी विरोधकांना दिले पुन्हा एकदा आव्हान
- ‘बहिर्जी’ स्वराज्याचा तिसरा डोळा’ चित्रपटातून ‘बहिर्जी नाईकांच्या चरित्राला उजाळा
- डॉक्टरांची मेहनत फळाला आली; कपिल देव यांना मिळाला डिस्चार्ज
- ‘लालूंनी जादूटोण्याच्या सहाय्याने मला मारण्याचा प्रयत्न केला’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
