🕒 1 min read
नागपूर- शांत आन संयमी स्वभाव असणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज रुद्रावतार पाहायला मिळाला. केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं. या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यावेळी एकंदर कामकाजाचा परामर्ष घेताना नितीन गडकरी चांगलेच संतापलेले बघायला मिळाले.
गडकरी यांच्या हस्ते केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचं उद्घाटनप्रसंगी बोलत असताना त्यांनी हे उद्गार काढले. पुढे बोलताना संतापलेले गडकरी म्हणाले की, अशा कार्यक्रमात प्रथा असते की, कोणतंही काम पूर्ण झाल्यानंतर सगळ्यांचं अभिनंदन केलं जातं. पण मला संकोच वाटतोय की, तुमचं अभिनंदन कसं करू? कारण २००८मध्ये निश्चित झालं होत की, अशा पद्धतीची इमारत उभारण्यात येईल. २०११ मध्ये याची निविदा निघाली आणि हे दोनशे अडीचशे कोटींचं काम नऊ वर्षांनंतर आज पूर्ण झालं आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी लागलेल्या वेळेत तीन सरकारं आणि आठ अध्यक्ष राहिले. त्यानंतर आज हे काम पूर्ण झालं आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सध्याच्या अध्यक्षांचा याच्याशी काही संबंध नाही. पण ज्या महान लोकांनी २०११ पासून २०२० पर्यंत हे काम केलं, त्यांचे फोटो या कार्यालयात लावण्याचा प्रयत्न करा, असा खोचक टोला गडकरींनी अधिकाऱ्यांना लगावला.
८० हजार १ लाख कोटी रूपयांच्या निधीतून तयार करण्यात येणारा दिल्ली-मुंबई महामार्ग तीन वर्षात पूर्ण करणार असल्याचं आपण अभिमानानं सांगत आहोत. इतका मोठा महामार्ग तीन साडेतीन वर्षात पूर्ण होणार असेल आणि या दोनशे कोटीच्या कामासाठी आपण दहा वर्ष लावली, तर हे अभिनंदन करण्यासारखं नाही. मला याची लाज वाटते आहे. जे विकृत विचारांचे लोक (अधिकारी) आहेत, त्यांनी निर्णय न घेता समस्या तयार केल्या, अशा शब्दांत गडकरींनी अधिकाऱ्यांचा समाचार घेतला.
माझं नाव बदनाम झालंच आहे. रस्त्यांचं काम पूर्ण करण्यापेक्षा कामचुकार अधिकाऱ्यांना हाकलून लावलं. त्यांना सेवामुक्त केलं, हेच माझं उद्दिष्ट आहे. मला मंत्र्यांचे अधिकार माहीत आहेत. माझा स्वभाव संवेदनशील आहे. लोकांचं वाईट करण्याचा नाही, पण आता मला वाटत अशा लोकांची धुलाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
महत्वाच्या बातम्या
- कोळसा घोटाळा करणाऱ्या माजी मंत्र्याला न्यायालयाने सुनावाली 3 वर्षांची शिक्षा
- ‘श्रावणबाळ’आदित्य ठाकरे दिनोच्या घरी संध्याकाळी तुळशीपूजेला जातो का? : नितेश राणे
- तुम्ही काय‘श्रावणबाळ’ जन्माला घातलाय का?; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
- अहो,हे सरकार कधी पडेल हे उद्धव ठाकरे यांना सुद्धा कळणार नाही : रामदास आठवले
- आरपीआयच्या माध्यमातून आता मी देशासाठी काम करेन : पायल घोष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
