Share

Narayan Rane | “…त्यावेळी खरी गद्दारी उद्धव ठाकरे यांनी केली”

Published On: 

मुंबई : सध्याच राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आपल्याला माहित असेल की, शिंदे गटाने भाजपसोबत युती करू राज्यात सरकार स्थापन केल्यापासून शिंदे गटाला ठाकरे गटाकडून गद्दार म्हटलं जात आहे. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये सतत आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. परंतू यांच्या वादामध्ये आता भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले नारायण राणे ?

शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने 2019 च्या निवडणुकीत एकत्र निवडणुक लढली असताना, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीची स्थापना करुनच खरी गद्दारी केली आहे, असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच हल्ला केला आहे. नारायण राणे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

शिवसेना पक्ष हा बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व आणि त्यांना शिवसैनिकांची मिळालेली साथ यामुळे घडला आहे. काळाच्या ओघात याचा विसर अनेकजणांना पडला असला तरी प्रत्येक शिवसैनिकांना इतिहास हा माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हेच खरे शिवसैनिक आहेत. शिंदे यांनीच पडत्या काळात बाळासाहेब ठाकरे यांना साथ दिल्यानेच शिवसेना उभी राहिली असल्यचं नारायण राणे यांनी सांगितलं.

तसेच, नारायण राणे यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, कसला आदित्य ठाकरे काय कळतं त्याला, थोड्या दिवसात सर्व बाहेर येईल. आता त्यांचा काळ संपला आहे. भविष्यात मंत्री, मुख्यमंत्री संधी त्यांना मिळणार नाही

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!