Share

Narayan Rane |आदित्य बालिश आहेस, गप्प बस; नारायण राणेंचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार सोबत घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. मात्र यानंतर आपल्या विस्कळीत झालेल्या पक्षाची पुन्हा नव्याने मोट बबांधण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी आज बोलताना आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांचा समाचार घेतला आहे. मात्र यानंतर दुसरीकडे आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय.

शिवसेना नेते आदित्य ठाकरेंकडून शिंदे गटाचा उल्लेख हा वारंवार गद्दार असा होत आहे. याचवर आज केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरेंना सुनावलं आहे. आदित्यला दुसरं काही येत नाही, गद्दारी रक्तात असल्याने वारंवार हा शब्द वापरतात, असं राणेंनी सुनावलं.निवडणुकीत एकत्र लढूनही मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंनी जे केलं त्याला गद्दारी म्हणतात, असंही राणेंनी ऐकवलं.

तसेच यानंतर पुढे दसरा मेळाव्याबाबत बोलताना शिंदे गटच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेईल असा दावाही यावेळी राणेंनी केला. उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर नारायण राणेंनी अत्यंत घणाघाती टीका केली आहे. आदित्य ठाकरे वेड्यासारखा बडबड करत असतो, असंही राणेंनी सुनावलं. मातोश्री आतल्या आणि बाहेरच्या नको त्या गोष्टी सांगू. मग पळताभुई कमी होईल. आदित्य बालिश आहेस गप्प बस, गद्दार शब्दाचा अर्थ माहित नाही कुणाला वापरतात, असा इशारा राणेंनी दिला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!