मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मराठवाडा मुक्ति संग्राम दिनानिमित्त राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
संपूर्ण देशाच्या इतिहासात मराठवाडा मुक्ती लढा हा प्रदीर्घ लढा होता. मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात अनेक ज्ञात व अज्ञात लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. मुक्ती संग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मी या ऐतिहासिक लढ्यातील सर्व हुतात्म्यांना आपली भावपूर्ण आदरांजली वाहतो.
या वर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाला सुरूवात होत आहे. राज्यातील सर्व जनतेला तसेच आज जगभर विखुरलेल्या मराठवाड्यातील बंधू भगिनींना मी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Narayan Rane |आदित्य बालिश आहेस, गप्प बस; नारायण राणेंचा इशारा
- Eknath Shinde | पर्यावरणपूरक सवयी अंगिकारून पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने हातभार लावावा – एकनाथ शिंदे
- Remedies For Dengue | डेंग्यूमध्ये शेळीचे दूध, नारळ पाणी आणि पपईच्या पानांच्या रसाचे आहे अनेक फायदे..जाणून घ्या!
- Varun Sardesai | सरकारचं काय चाललंय? एक आमदार धमकी देतो, दुसरा बंदूक काढतो; वरुण सरदेसाई संतापले
- Viral video | चक्क मांजराचा विमान प्रवास! व्हिडिओ पाहून व्हाल थक्क…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

