Share

Narayan Rane | हातातून सत्ता गेल्यापासून आदित्य ठाकरे सैरभैर झाले आहेत – नारयण राणे

Published On: 

मुंबई :  महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण सध्या खुपच गढुळ झालं आहे. विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षनेते एकमेकांवर आरोप करत असतात. त्यामध्ये वेदांता प्रकरणावरून तर राजयकीय वातावरण तर आणखिनच तापलं आहे. अशातच भाजप पक्षाचे नेते नारायण राणे ठाकरे कुटुंबावर आरोप करण्याची एक पण संधी सोडत नाही. अशातच नारायण राणे यांनी शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला केला आहे.

काय म्हणाले नारायण राणे ?

नारायण राणे यांनी काल प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना प्रकारांनी आदित्य ठाकरेंविषयी विचारला असता त्यावर ते म्हणाले की, त्यांच्या बद्दल आम्ही अधिकचे बोलणार नाही. कारण हातून सत्ता गेल्यापासून ते सैरभैर झालेला आहेत, असं म्हणत नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर खोलवल वार केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा कारण…-

पुढे नारायण राणे बोलताना असंही म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी आता राजीनामा दिला तरी काय फरक पडणार आहे. एकतर सत्तेत असून काही फरक पडला नाही. आता विरोधात असल्याने त्याने तर रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे.

तसेच, नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने 2019 च्या निवडणुकीत एकत्र निवडणुक लढली असताना, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीची स्थापना करुनच खरी गद्दारी केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!