Share

केकेच्या हत्याप्रकरणी नंदिता पुरी यांचा धक्कादायक आरोप, म्हणाल्या…

Published On: 

मुंबई :  तीन दशकांहून अधिक काळ भारतीय संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवणारे प्रख्यात गायक केके यांचे वयाच्या अवघ्या ५३ व्या वर्षी निधन झाले. कोलकाता येथे एका कार्यक्रमात परफॉर्म करताना, केके यांना अचानक अस्वस्थ वाटत होते. यानंतर ते आपल्या हॉटेलकडे पुन्हा गेले असता, तिथेही त्यांना अस्वस्थ वाटून ते कोसळले. यानंतर त्यांना कोलकाता मेडीकल रिसर्च इन्स्टिटय़ूट येथे दाखल करण्यात आले. पण काही वेळातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यामुळे त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. दिवंगत अभिनेते ओम पुरी यांची पूर्वाश्रमीची पत्नी नंदिता पुरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.


नंदिता यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “पश्चिम बंगालला लाज वाटायला हवी. कोलकाता प्रशासनाने केकेची हत्या केली आणि आता पश्चिम बंगाल सरकार यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतेय. कॉन्सर्टमध्ये कोणतीही दक्षता घेतली गेली नव्हती. अडीच हजार क्षमता असलेल्या नजरूल मंच या ऑडिरोटीयममध्ये जिथे अडीच हजार  लोकांची जागा होती तिथे ७ हजार लोक होते. एसी काम करत नव्हते. केके घामाघुम झाला होता. चार  वेळा तक्रार करूनही त्याचं कोणीही ऐकलं नाही. ना औषधं होती, ना प्राथमिक उपचाराची सोय होती, याची सीबीआय चौकशी व्हायला हवी. तोपर्यंत बॉलिवूडने पश्चिम बंगालमध्ये परफॉर्म न करता बायकॉट केलं पाहिजे,”

नंतर पुढे त्या म्हणाल्या, कोलकाता आणि तिथल्या लोकांना मला दोषी ठरवायचे नाही. माझा उद्देश्य फक्त तेथील मंचाच्या मॅनेजमेंट सांभाळणाऱ्या लोकांना दोषी ठरवायचा होता.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!