नांदेड : ‘हल्ला बोल’ मिरवणूकिला पोलिसांकडून परवानगी नाकारल्या नंतर शीख बांधव व नांदेड पोलिसांमध्ये काल तणाव निर्माण तणाव निर्माण झाला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मिरवणुकीला परवानगी नसतानाही काही तरुणांनी मिरवणुकीची तयारी केली होती. याच दरम्यान सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पोलीस आणि तरुणांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. यात जमावाच्या हल्ल्यात या परिसरात उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
काही हल्लेखोरांनी पोलीसांशी हुज्जत घालून बॅरिगेट्स तोडले. चौरस्त्यावर घटनेचे शूटिंग करणाऱ्या अनेकांचे मोबाईल या वेळी फोडण्यात आले. पोलीस उप-अधिक्षक यांच्या गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत सुमारे अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर ३० ते ४० मोबाईल फोडण्यात आले
दरम्यान, हे सर्व सुरु असताना हल्लेखोरांनी थेट पोलीस अधीक्षकांवर तलवारीने जीवघेणा हल्ला केला. मात्र एसपी प्रमोद शेवाळे यांच्यावर झालेला हल्ला त्यांचा अंगरक्षक दिनेश पांडे यांनी आपल्या अंगावर घेतला. या हल्ल्यात दिनेश पांडे गंभीर जखमी असून रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे.त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत.
दरम्यान,हल्लेखोरांनी पोलिसांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या, टायरमधील हवा काढून टाकली तसेच वाहनांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे. यामुळे सदर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी रात्री उशिरा पर्यंत ४०० नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेचा सोशल मीडियात व प्रसारमाध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. त्यामुळे समाजमाध्यमातुन मोठ्या प्रमाणात जाहीर निषेध होत असून आरोपींना तात्काळ अटक करून शिक्षा व्हावी अशी मागणी होताना पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पंढरपूर पोटनिवडणूक : भाजपचं ठरल ! ‘हा’ नेता उद्या भरणार उमेदवारी अर्ज
- ऑपरेशन लोटस सुरु ? चंद्रकांतदादा म्हणाले, पहाटेच्या शपथविधी सारखं समजेलच !
- नांदेड जिल्हा; सिलिंडरच्या स्फोटात ३ घरे भस्मसात
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- ‘बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदींना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

