Share

नांदेडचे खा.चिखलीकरांच्या वाहनाची स्कुटीला धडक? एकाचा मृत्यू

Published On: 

🕒 1 min read

लातूर : लातूर-चाकूर रोडवर सोमवारी झालेल्या एका अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. गोविंद भदाडे असे या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गोविंद भदाडे हे लातूरहून चाकूरकडे दुचाकीवरुन येत होते. दरम्यान भदाडे यांच्या गाडीला धडक दिलेली कार (एमएच २६, बीक्यू ९९९९) ही नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची आहे अशी चर्चा या परिसरात सुरु आहे.

चाकूर येथील रहिवासी गोविंद निवृत्ती भदाडे हे सोमवारी सकाळी लातूरकडून चाकूरकडे दुचाकीवर जात होते. या दरम्यान नांदेडहून लातूरकडे (एमएच २६, बीक्यू ९९९९) ही कार जात होती. या रस्त्यावर नांदगाव पाटीनजीक कार व दुचाकीची एकमेकासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत गोविंद भदाडे यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातत दाभाडे यांच्या दुचाकीचा चक्काचूर झाला तर कारच्या समोरील भागाचेही मोठे नुकसान झाले. भदाडे हा पुणे येथे काम करीत होता. तो पुण्याहून दुचाकीवर गावाकडे येत होता, असे सांगण्यात आले.

या अपघातानंतर काही वेळातच घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक हरिदास उळागड्डे, पो.हे.कॉ. दत्तात्रय गिरी, नितीन चव्हाण, राहुल गव्हाणे हे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, चाकूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट, स.पो.नि. संदीप कामत, पो.हे.कॉ. भागवत मामडगे, सुशांत दिवटे हेही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उत्तरीय तपासणीसाठी गोविंद भदाडे यांचा मृतदेह नळेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठिवला. भदाडे यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!