लुधियाना : अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीसाठी देशव्यापी देणग्या गोळा करण्यासाठी महाअभियान हाती घेण्यात आल होती. या मोहिमेचा समारोप अलीकडेच करण्यात आला. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी राम मंदिराच्या देणगीवरून भाजपला घेरले असताना, दुसरीकडे मात्र पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राम मंदिर उभारणीसाठी दोन लाखांची देणगी दिली आहे.
राम मंदिर उभारणीसाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेचा समारोप रविवारी पंजाबमध्ये करण्यात आला. याचा पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राम मंदिर उभारणीसाठी दोन लाख रुपयांची देणगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या देणगीबाबत प्रांत संयोजक राम गोपाल यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, राम मंदिराच्या निधी संकलनावरून काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली होती. भगवान श्रीरामाच्या नावाखाली देणगी जमा करण्याचा ठेका भाजपला दिलाय का? ते कोणत्या नियमाखाली ही देणगी जमा करत आहेत? राम मंदिराच्या नावाखाली टोलवसुली सुरू आहे. केंद्र सरकारने याचे उत्तर द्यायला हवे, असा आरोप नाना पटोले यांनी विधानसभेत केला होता.
महत्वाच्या बातम्या
- शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण आता कशाला?
- पत्नीच्या संशयानुसार सचिन वाझेनेच मनसुख हिरेनला मारले, देवेंद्र फडणवीस सभागृहात आक्रमक
- महाविकास आघाडीचा विदर्भ, मराठवाड्यावर शैक्षणिक अन्याय; परीक्षा मंडळावर एकट्या पुण्यातुन 10 सदस्य
- ‘अमृता ताई गाण्याची आवड जोपासण्याचा प्रयत्न करता… अशीच आवड जोपासा’
- मुंबईतील नाईट क्लब सर्वात आधी बंद करू, मुंबईच्या पालकमंत्र्याचे संकेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
