सोलापूर : शहराच्या पर्यटनात वाढ होण्यासह गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकासाठी आवश्यक तितक्या निधीची तरतूद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंगळवेढ्यावर लक्ष देत प्रलंबित प्रश्नाला न्याय दिल्याने लिंगायत बांधवांतून आनंद व्यक्त होत आहे.
मंगळवेढा शहरालगत महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी बसवप्रेमी नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मागील सरकारच्या काळात याबाबत तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समिती निश्चित करण्यात आली. या समितीने कृषी खात्याची 35 एकर जागा निश्चित करून 100 फुटांची मूर्ती, स्मारक परिसरामध्ये ग्रंथालय, ध्यान केंद्र, अभ्यास केंद्र, स्मारक, कृषी पर्यटन स्थळ, भक्त निवास, शेतकरी निवास, बसवेश्वरांची माहिती देणारे फलक आधी निश्चित करण्यात आले.
या समितीने 151 कोटींचा प्रस्ताव शासनास सादर केला. तत्कालीन आमदार दिवंगत भारत भालके यांनी अनेक वेळा विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. स्मारकावरून अध्यक्ष विजयकुमार देशमुख यांच्यावर आरोप देखील केले. परंतु मागील सरकारच्या काळात स्मारकाची देखभाल – दुरुस्ती करण्याची जबाबदारी कोणी घ्यायची, यावरून हा प्रस्ताव परत आला. नगरपालिकेने पत्र दिले. परंतु जागा ही नगरपालिकेच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर असल्याने याबाबतची जबाबदारी कृषी खात्याकडे दिली असल्याचे समजते.
महाविकास आघाडी सरकारने महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकासाठी निधीची तरतूद केल्यामुळे भविष्यकाळात या मार्गावरून ये – जा करणाऱ्या पर्यटकांना या ठिकाणी पर्यटन संधी उपलब्ध होऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण स्मारकाबाबतची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे यांच्याकडून घेतली. त्या वेळीच निधीची तरतूद होण्याचे संकेत मिळाले. लवरकरच स्मारकास सुरवात होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण आता कशाला?
- पत्नीच्या संशयानुसार सचिन वाझेनेच मनसुख हिरेनला मारले, देवेंद्र फडणवीस सभागृहात आक्रमक
- महाविकास आघाडीचा विदर्भ, मराठवाड्यावर शैक्षणिक अन्याय; परीक्षा मंडळावर एकट्या पुण्यातुन 10 सदस्य
- ‘अमृता ताई गाण्याची आवड जोपासण्याचा प्रयत्न करता… अशीच आवड जोपासा’
- मुंबईतील नाईट क्लब सर्वात आधी बंद करू, मुंबईच्या पालकमंत्र्याचे संकेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
