Share

IPL 2022: “मुंबई ईशान किशनला विकत घेण्यासाठी सगळे प्रयत्न करेल”; आकाश चोप्राचा ठोस दावा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएलचे मेगा ऑक्शन बँगलोर येथे १२ ते १३ फेब्रुवारीला होणार आहे. यासाठी प्रत्येक संघाने चांगले खेळाडू आपल्या सांगत यावे यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याच पार्शवभूमीवर ५ वेळा आयपीएल विजेता संघ मुंबई इंडियन्स संघ ईशान किशनला संघात घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे भारताचे माजी फलंदाज आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी म्हटले आहे.

मेगा ऑक्शनसाठी ईशान किशनची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे. आकाश चोप्रा याने मुंबई ईशानला पुन्हा खरेदी करेल याबाबत सांगितले आहे कि ” ईशान किशनला परत मिळवण्यासाठी मुंबई त्यांच्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करेल . त्यांना यावेळी जास्त खर्च करावा लागेल पण हो, आतापर्यंत ईशानने त्यांच्यासाठी जी कामगिरी केली आहे त्या तुलनेत ते त्याला संघात घेतील.मुंबईचा अष्टपैलू हार्दिक पंड्या अहमदाबाद टायटन्समध्ये गेला आहे, तर यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक आणि ईशान किशन यांना संघात घेतले जाऊ शकते हे लक्षात घेऊन आयपीएल २०२२ मध्ये यश मिळवण्यासाठी मुंबईला वेगळा फॉर्म्युला शोधावा लागेल.”

आयपीएल मेगा ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, किरॉन पोलार्ड आणि सूर्यकुमार यादव यांना रिटेन केले आहे. १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी मेगा ऑक्शनचे आयोजन केले गेले आहे. तसेच मूळ स्पर्धा या वर्षी मार्चच्या शेवटी सुरू होईल आणि अंतिम सामना मेमध्ये खेळला जाईल, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!