Share

 “शिवप्रेमी नाराज…”; महानगरपालिका आयुक्तांवर झालेल्या शाई फेकीवर नवनीत राणांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

अमरावती: राजपेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अनधिकृत पद्धतीने बसवलेला पुतळा महानगरपालिकेने हटवला. त्याचा राग मानत ठेवत शिवप्रेमी भक्तांनी अमरावतीचे महानगरपालिका आयुक्त प्रवीण अष्टेकर यांच्यावर शाइफेक केली. याप्रकरणी दोन महिलांना अटक केली गेली आहे.

अमरावतीच्या भाजप खासदार नवनीत राणा यांच्या मतदार संघात हा प्रकार घडला. काही दिवसांपूर्वी राणा यांच्या मार्गदर्शनाखाली राजपेठ उड्डाणपूलाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृत रित्या बसविला होता. त्यानंतर चार दिवसांपूर्वी महानगरपालिकेने कारवाई करत तो पुतळा तेथून हटवला होता. त्याचे पडसाद या हल्ल्यातून पाहण्यास मिळाले आहेत. मात्र आता या हल्ल्याचा निषेध करत सर्व प्रशासकीय कर्मचारी संपावर जाण्याचा निर्णय घेणार असल्याचे वृत्त एकण्यास मिळते आहे.

खासदार नवनीत राणा यांना या प्रकरणी विचारणा केली असता त्यांनी, हे शिवप्रेमींची भावना दुखावल्याचे पडसाद आहेत असे म्हंटले. हा पुतळा हटवल्यापासून शिवप्रेमी नाराज आहेत. त्यांनी त्यांचा राग अश्या प्रकारे व्यक्त केला. याप्रकरणी आयुक्तांनी उत्तर देणे अपेक्षित आहे असेही राणा यावेळी म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!