Share

“आम्ही कोणाकडे मत मागायला गेलो नाही पण…”, AIMIM च्या निर्णयानंतर नाना पटोलेंचे मोठे वक्तव्य

Published On: 

मुंबई: औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील  (Imtiaz Jali) यांनी भाजपला हरवण्यासाठी AIMIM महाविकास आघाडीला मत देणार असल्याचे म्हटले आहे. यावरून सध्या राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. आता यावरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“आम्ही कोणाकडे मत मागायला गेलो नाही, परंतु जर कोणाला महाविकास आघाडी सरकारला मतदान करायचं असेल तर त्यात गैर काय? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे भाजपची जी खेळी आहे ती म्हणजे ज्यांनी बाभळीची झाडे लावली त्याला काटेच उगणार आंबे नाही. त्यामुळे भाजपने जे कटुतेचं राजकारण सुरु केलं आहे, त्याचे परिणाम हे आज त्यांना पाहायला मिळणार आहेत.”, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

दरम्यान “भाजपला हरवण्यासाठी एमआयएमने महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सहभागी असणाऱ्या शिवसेनेसोबत आमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद कायम राहतील.”, असे ट्वीट इम्तियाज जलील यांनी केले आहे.

तसेच दुसऱ्या ट्वीट मध्ये त्यांनी म्हटले आहे की, “आमच्या आमदारांच्या मतदारसंघात विकास व्हावा यासाठी आम्ही काही अटी ठेवल्या असून एमपीएससीमध्ये अल्पसंख्यांक सदस्याची नियुक्ती व्हावी तसेच महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे उत्पन्न वाढवण्यासाठी पावले उचण्याची मागणी करण्यात आली आहे. सोबतच मुस्लिमांसाठी आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील आमच्या दोन आमदारांना काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करण्यास सांगण्यात आले आहे.”

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!