Share

नाना पटोलेंनी घेतली राहुल गांधींची भेट; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाला वेग ?

Published On: 

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. २०१४ पासून काँग्रेसला लागलेली उतरती कळा रोखत सद्याचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्रातील सत्तेत काँग्रेसला सहभागी करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.

यानंतर, महत्वाच्या खात्याचा सांभाळ व राज्यातील काँग्रेसच्या कार्यासाठी पुरेसा वेळ देता येत नसल्याने थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे ठरवले आहे. यानंतर महाराष्ट्र काँग्रेसची धुरा कोणत्या नेत्याकडे जाणार याबाबत उत्सुकता वाढली होती. पृथ्वीराज चव्हाण, राजीव सातव, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, नाना पटोले अशा दिग्गज नेत्यांची नावे या पदासाठी चर्चेत होती.

यानंतर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, हायकमांड कडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. आज नाना पटोले यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांची 10 जनपथ या निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीमागील कारण अद्यापही गुलदस्त्यात असले तरी हायकमांड नाना पटोले यांच्या नावावर सहमत असल्याच्या दिवसभरातील चर्चा बघता, याच या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षासोबत महाराष्ट्रात आणखी काही संघटनात्मक बदल केले जातील याबाबत देखील चाचपणी सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!