मुंबई: कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर आंदोलन छेडले होते. मात्र पोलिसांनी मध्येच त्यांना अडवले. यानंतर नाना पटोले यांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे. यावरच आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.
“तुम्ही सर्व इथे उत्सफूर्तपणे आलात. त्याबद्दल तुमचं स्वागत. तुम्ही असताना कुणाची हिंमत नाही या ठिकाणी येऊन निदर्शने करण्याची. पंतप्रधान मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. उलट काँग्रेसने देशाची माफी मागायला हवी. काँग्रेसने या देशाचा बट्ट्याबोळ केला आहे. नाना पटोले वगैरे हे नौटंकीबाज लोकं आहेत. त्यांना कितीही नौटंकी करू द्या. त्याचा काही परिणाम होणार नाही.”, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान कॉंग्रेसचा ताफा फडणवीसांच्या घरापर्यंत पोहचू शकला नाही, त्यानंतर फडणवीस यांनी बंगल्याबाहेर येऊन कार्यकर्त्यांचे आभार मानले. दरम्यान काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना ‘सागर’ बंगल्याजवळून पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दुसरीकडे भाजप नेते राम कदम यांनी स्वतःच अपयश झाकण्यासाठी कॉंग्रेसची नौटंकी असल्याची टीका केली आहे. दरम्यान बाबुलनाथ परिसरातून भाजप कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “शिवसेनेत सूड उगवण्याची नीच प्रवृत्ती…”अतुल भातखळकरांचे टीकास्त्र
- ‘भाजपचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील’-संजय राऊत
- “…याला म्हणतात हात दाखवून अवलक्षण”, भातखळकरांचा हल्लाबोल
- ‘हमने बहुत बरदाश किया है, बरबाद भी हम ही करेंगे’; संजय राऊतांचा इशारा
- Goa Assembly elections 2022 : मोदींच्या प्रमोद सावंत यांना शुभेच्छा; ११ वाजेपर्यंत २६.६३ टक्के मतदान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

