Share

‘हमने बहुत बरदाश किया है, बरबाद भी हम ही करेंगे’; संजय राऊतांचा इशारा

Published On: 

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे तर हात धुवून संजय राऊत यांच्या मागे लागले आहेत. किरीट सोमय्या यांनी पुणे येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये (Pune Jambo Covid Center) भ्रष्टाचार प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत.

आता याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की मंगळवारी शिवसेना भवनात शिवसेना पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत आमदार खासदार सर्वच उपस्थित असणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेत विरोधकांच्या आरोपांना उत्तर देणार असल्याचे राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना म्हणाले, भाजपचे साडेतीन लोक अनिल देशमुख यांच्या कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील. पुढे बोलताना राऊत म्हणाले, हमने बहुत बरदाश किया है, बरबाद भी हम ही करेंगे, असं म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे. आता उद्याच्या पत्रकार परिषदेत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!