मुंबई : रत्नागिरीत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रदिप साळवी(Pradip Salvi) विजयी झाले. त्यांनी शहराच्या विकासकामाला गती दिली. त्यानंतर एका कार्यक्रमात बोलत असतांना साळवी म्हणाले की, शहराच्या खालच्या भागात आम्हाला मतदान झालेले नाही, त्या भागाचा विकास केला जाणार नाही. दरम्यान, साळवी यांच्या या वक्तव्यावर आता विरोधकांकडून टीकास्त्रांचा वर्षाव करण्यात येत आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले की,‘सूड उगवण्याची नीच प्रवृत्ती शिवसेनेत वरपासून खाली झिरपत येत असावी. मतदार या नीच प्रवृत्तीवर मतपेटीतून सूड उगवल्या शिवाय रहाणार नाहीत’, असा घणाघात भातखळकरांनी केला आहे.
सूड उगवण्याची नीच प्रवृत्ती शिवसेनेत वरपासून खाली झिरपत येत असावी.
मतदार या नीच प्रवृत्तीवर मतपेटीतून सूड उगवल्या शिवाय रहाणार नाहीत. pic.twitter.com/Z9zptjIXec— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 14, 2022
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार साळवी यांच्या कारकिर्दीत खालच्या भागाकडे दुर्लक्ष करण्यात आले असून विकासकामांत शहराचे दोन भाग केल्याचे आढळून आले आहे. एसटी स्टॅण्डच्या खालची काही कामे झाली नाहीत. जी झाली ती अर्धवट आहेत. पंरतू, इतर प्रभागांत चांगल्या सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- “…याला म्हणतात हात दाखवून अवलक्षण”, भातखळकरांचा हल्लाबोल
- ‘भाजपचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील’-संजय राऊत
- IPL AUCTION 2022: आता राजस्थाचा नवीन संघ ‘हल्ला बोल’ करणार!
- Goa Assembly elections 2022 : मोदींच्या प्रमोद सावंत यांना शुभेच्छा; ११ वाजेपर्यंत २६.६३ टक्के मतदान
- ‘सागर’ बंगल्यावरील कॉंग्रेसने आंदोलन मागे घेतले; नाना पटोलेंची घोषणा


