गोवा: आज गोवा विधानसभा (Goa Assembly elections) मतदानाचा दुसरा टप्पा असून पहाटे पासून ११ वाजेपर्यंत २६.६३ टक्के मतदान झाले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान गोव्यातील सर्व ४० विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व्यतिरिक्त काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस हे प्रमुख दावेदार आहेत. तर पणजीत भाजप नेते मोन्सेरात, अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर आणि काँग्रेसचे एल्विस गोम्स यांच्यात तिरंगी लढत होत आहे. त्यामुळे गोव्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच रंगताना दसून येते आहे.
दरम्यान भाजपचे माजी नेते उत्पल यांनी गेल्या महिन्यात भाजपला रामराम ठोकत अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठीही यंदा मोठी लढत असणार आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात भाजपला बहुमत मिळणार असल्याचा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा, त्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही गोव्यात सभा घेत सेनेची ताकत दाखवून दिली आहे. दरम्यान आज सर्वच पक्षांसाठी हा महत्वाचा दिवस असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसुन येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- सागर बंगल्यावर आंदोलन करणाऱ्या कॉंग्रेसचा ताफा पोलिसांनी अडवला; पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड
- IPL AUCTION 2022: आगामी हंगामासाठी ‘या’ संघासह होणार हैद्राबादचा सनराईस
- “गजवा-ए-हिंदचे स्वप्न पाहणाऱ्यांचे…”, योगी आदित्यनाथांचे मोठे वक्तव्य
- IPL AUCTION 2022: बँगलोरचा ‘रॉयल’ संघ प्रतिस्पर्धीना चॅलेंज देणार
- “काही दिवसांत भाजपचे साडे तीन लोक अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील”, संजय राऊतांचा मोठा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

