Share

‘तुम्हाला सत्तेवरून पायउतार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’; नाना पटोलेंचा भाजपला इशारा

Published On: 

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) पंजाब दौऱ्यादरम्यान उद्भवलेल्या सुरक्षा प्रश्नावरून राजकारण चांगलेच तापले आहे. यामागे मोठे कटकारस्थान होते, असा दावा करत भाजपने (BJP) पंजाब सरकारवर तसेच कॉंग्रेस (Congress) पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही चूक नसल्याचे राज्य सरकार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले आहे.

या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे, पंतप्रधानांचा कोणताही दौरा असला तरी १५ दिवसांपूर्वीपासूनच सुरक्षेच्या सर्व व्यवस्था पाहिल्या जातात. तीन गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली जाते. एसपीजी या सर्वांचं कंट्रोल करत असते. एसपीजी गृहखात्यांतर्गत येते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या यंत्रणांचे प्रमुख आहेत. त्यामुळे पंतप्रधानाच्या सुरक्षेमधील त्रुटीबाबत गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचा विश्वास घात केला. त्याला उत्तर देण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं आहे. पंतप्रधानांना शेतक-यांच्या रस्त्यात खिळे ठोकले, शेतकऱ्यांना आतंकवादी, दहशतवादी आणि आंदोलनजीवी म्हणून हिणवले. पण शेतक-यांनी आपला लढा सुरु ठेवला आणि हुकुमशाही वृत्तीच्या पंतप्रधानांची घमंड जिरवली शेतकरी लढवय्या असून तुम्हाला सत्तेवरून पायउतार करून घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही नाना पटोले यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!