Share

केंद्रातलं सरकार बरखास्त करा आणि निवडणुका घ्या, त्यानं संपूर्ण देशातला कोरोना नष्ट होईल’

Published On: 

मुंबई : देशात दररोज कोरोना रुग्णांची वाढती संख्या भीषण समस्या निर्माण करत आहे. यामध्ये आणखी समस्या निर्माण झाल्या आहेत त्या अपुऱ्या आरोग्य सेवांमुळे २०२० प्रमाणे याही वर्षी देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. किंबहुना मागच्या वर्षीच्या तुलनेत कोरोना हा गंभीररित्या वेगानं देशात पसरत आहे.

दुसरीकडे देशातील पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या निवडणुकांमुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. यामध्ये राजकीय पक्ष मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत. तर बंगाल मधील निवडणूक प्रचार जीवघेणा ठरत आहे. काँग्रेसच्या एका उमेदवाराने यामुळे आपला जीव गमावला आहे.

एकीकडे देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे तर दुसरीकडे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान निवडणूक प्रचार सभेत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसतंय. त्यामुळे बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पंतप्रधान मोदींपासून ते गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत भाजपच्या सगळ्या स्टार प्रचारकांनी पश्चिम बंगालमध्ये मोठमोठाल्या जनसभा तसेच प्रचार रॅली काढल्या आहेत आणि त्या आजही सुरु आहेत. एकीकडे देशात कोरोनाचा कहर पहायला मिळत असताना दुसरीकडे निवडणुकांमध्ये नेते मश्गुल असलेले पहायला मिळत आहेत.

एकीकडे कोरोनाची परिस्थिती आणि दुसरीकडे लाखोंच्या जनसभा याबाबत विचारले असता गृहमंत्री म्हणाले की, ‘हे बघा, महाराष्ट्रात निवडणुका आहेत का? तिथे 60 हजार केसेस आहेत तर इथे 4 हजार आहेत. महाराष्ट्रासाठी माझ्या हृदयात अनुकंपा आहे आणि बंगालसाठी देखील आहे. याला निवडणुकीशी जोडणं योग्य नाहीये. कारण जिथे निवडणुका नाहीयेत तिथे कोरोना वाढलाय. याला तुम्ही काय म्हणाल?’ असा निर्वाळा अमित शहा यांनी केला आहे.

अमित शहा यांच्या या विधानाचा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. निवडणुका जिथे आहेत, त्या राज्यांमध्ये कोरोना नाही, असं गृहमंत्री अमित शहा म्हणतात. मग केंद्रातलं सरकार बरखास्त करा आणि देशात निवडणुका घ्या. त्यानं संपूर्ण देशातला कोरोना नष्ट होईल असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!