Share

…तर तन्मयला लस देणं हे अयोग्यच ! देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

Published On: 

मुंबई : सध्या फक्त ४५ वर्षांपुढील नागरिकांनाच कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यास परवानगी असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याने लसीकरण करून घेतले आहे. वयोवर्षे ४५ च्या आतील असतानाही तन्मय फडणवीस याने लसीकरण केल्याच्या फोटोची पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्याच्यावर चांगलीच टीकेची झोड उठली आहे.

त्याने तो फोटो काही वेळात डिलीटही केला. मात्र त्याआधी त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले. यामुळे त्याचे वय ४५ च्या पुढील नसताना, तो फ्रंट लाईन वर्कर नसतानाही त्याचे लसीकरण कसे झाले ? असे सवाल निर्माण होत आहेत. काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं असून आता त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

‘तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण जर नियमावलीचं उल्लंघन झालं तर हे अगदी अयोग्य आहे. पात्र नसल्याने मी माझ्या पत्नीला व मुलीलाही लस दिलेली नाही. प्रत्येकाने नियमांचं पालन केलच पाहिजे असं माझं ठाम मत आहे,’ असं फडणवीस म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!