जालना: कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लागू असलेल्या ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत गोरगरीब, फेरीवाले, ॲटोरिक्षा चालक आदींना जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक मदतीचे तात्काळ व पारदर्शकपणे वाटप करण्यात यावे, असे निर्देश महाराष्ट्र विधीमंडळ आश्वासन समितीचे अध्यक्ष आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात गोरगरिबांना आर्थिक मदत लवकर मिळेल का हा प्रश्न निर्माण झाला आहे
रविवारी आ. गोरंट्याल यांच्या निवासस्थानी महसूल, नगर पालिका प्रशासन, निराधार समितीचे नेते, ॲटोरिक्षा चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीस तहसीलदार श्रीकांत भुजबळ, नायब तहसीलदार नंदकिशोर दांडगे, नगर पालिकेचे अधिकारी विजय सांगळे, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे पोलीस निरीक्षक उदय साळुंके, नितीन पाटील, कामगार संघटनेचे नेते सगीर अहेमद तसेच
मराठवाडा ॲटोरिक्षा युनियनचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते या बैठकीत कोरोना महामारीचा उद्रेक रोखण्यासाठी लागू असलेल्या ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत गोरगरीब, फेरीवाले, निराधार, ॲटोरिक्षा चालक आदींना राज्य सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक मदतीच्या कार्यवाहीबाबत चर्चा झाली. याबाबतचा आढावाही घेण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- ‘मला कोणीही ‘अनफिट’ म्हटलेले मला आवडत नाही’
- लॉकडाऊनचा निर्णय जाहीर होणार? मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक
- कोरोना स्प्रेडर! जालना शहरात मोकाट फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी, चौघांचा अहवाल पाॅझिटिव्ह
- दिव्याखाली अंधार अन जगाच्या बाता मारताय !, भाजपचं संजय राऊतांना प्रत्युत्तर
- ब्रेक द चेन! जालना शहरात चार पोलीस ठाण्यांचे दीडशे पोलिस रस्त्यावर; कडक संचारबंदी लागू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

