मुंबई – नाना पटोले यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी काँग्रेस नेत्यांकडे केली नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय. काल शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांची सिल्वर ओक वरती बैठक झाली. त्यामध्ये तुम्ही वेगळेच लढणार असेल तर आधीच सांगा, आम्हीही तयारीला लागतो असं शरद पवारांनी सांगितलं. जर दिल्लीवरून ठरलं असेल तर आम्हाला काही अडचण नाही किंवा नाना पटोलेंना अधिकार दिले असतील तर तसही सांगा असंही शरद पवारांनी सांगितल्याचं समजतंय.
नानांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडत आहे. त्यामुळे, शिवसेनेनं नानांना वक्तव्यावरुन हो द्या खळबळ, असे म्हणत नानांचं कौतुक करताना अप्रत्यक्ष टीकाही केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनंही नाना पटोलेंना लहान म्हटलंय. तर, दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जलभूषण पुरस्कार सन्मान सोहळ्यावेळी बोलताना नाना पटोलेंना लक्ष्य केले.
‘बाळासाहेब थोरात यांनी करोनाची भीती न बाळगता आम्हाला जेवण्यासाठी बोलवावं, आम्ही तुमच्याकडे येऊन स्वबळावर जेवू, असा टोला लगावला उद्धव ठाकरेंनी लगावला. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नका नाहीतर उद्या जेवणावरुन आघाडीत बिघाडी असं व्हायचं, पण तसं काही नाही,’ असं स्पष्टीकरणही ठाकरेंनी दिलं.
माझी आतापर्यंतची राजकीय कारकिर्द काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विरोधातील आहे. जे काही कानावर पडलं ते राजकीय मतभिन्नतेचं पडलं होतं. पण, याचा अर्थ आम्ही विरोधक होतो म्हणजे तुम्ही केलं ते सगळं वाईट असं नाही. शिवसेनेची किंवा शिवसेना प्रमुखांची अशी भूमिका कधीच नव्हती, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आघाडीत बिघाडी नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र, स्वबळाची भाषा करणाऱ्या नाना पटोलेंना टोलाही लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
- कंगनाच्या चित्रपटात दिसणार नवाजुद्दिन सिद्दिकी; पोस्ट शेअर करत दिली माहिती
- नानांच्या बोलण्याने दोन दिवस राजकारणात गरमी आली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली काय?
- नवख्या इंग्लंडकडुन पाकिस्तानला व्हाईटवॉश; अखेरच्या सामन्यात ३ गडी राखुन विजय
- ‘मुंबईची २०२४ पर्यंतची विजेची गरज लक्षात घेता वीजनिर्मिती तसेच वीजपुरवठ्याचे प्रकल्प गतीने मार्गी लावा’
- स्वबळाचे नारा देणाऱ्या काँग्रेसला पवारांनी फटकारले, कॉंग्रेस नेत्यांना दिला ‘हा’ सूचनावजा इशारा


