Share

‘आदित्यच्या म्हणण्याप्रमाणे रामदास कदम मंत्री असताना गोट्या खेळत होते का ?’

Published On: 

मुंबई : राज्यात पर्यावरणपूरक अशा इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येणार आहे. यासाठी वापरकर्ते आणि कंपन्यांना विविध प्रोत्साहने देणाऱ्या राज्याचे महत्वाकांक्षी असे इलेक्ट्रीक वाहन धोरण 2021ची राज्याचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणास मान्यता देण्यात आली आहे. सन २०२५ पर्यंत नवीन वाहन नोंदणीत १० टक्के हिस्सा बॅटरी इलेक्ट्रिक वाहनाचा असेल असे उद्दिष्ट निर्धारीत करण्यात आले असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. तर गेल्या दीड वर्ष पर्यवरण खाते अतिशय गंभीरपणे काम करत असल्याचे देखील आदित्य ठाकरे बोलले आहे.

यावरून भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांन आदित्य ठाकरे यांना चांगलाच फैलावर घेत माजी पर्यावरण मंत्री आणि जेष्ठ शिवसेना नेते रामदास कदम यांना जोरदार टोला लगावला आहे. ‘अदित्य ठाकरेच्या अगोदर रामदास कदम या खात्याचे मंत्री होते. आदित्यच्या म्हणण्याप्रमाणे रामदास कदम मंत्री असताना गोट्या खेळत होते का ? काय रामदास कदम काय अवस्था झाली तुमची शिवसेनेत, कालचं शेंबडं पोर तुम्हाला लुक्क्यात मोजतोय.’ असा टोला राणेंनी लगावला आहे.

दरम्यान, सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे म्हणाले की, वातावरणातील बदलाचे गंभीर परिणाम आता आपण सर्वच जण अनुभवत आहोत. उष्णतेमधील वाढ, वारंवार येणारी चक्रीवादळे, अतिवृष्टी अशा विविध आपत्तींचा आपणास सामना करावा लागत आहे. त्याअनुषंगाने पर्यावरणपूरक धोरणे आपल्याला स्वीकारावीच लागतील. राज्यशासनाने यासाठी पुढाकार घेतला असून माझी वसुंधरा अभियान, पर्जन्य जल संकलनास प्रोत्साहन, सौर उर्जेच्या वापरास चालना देण्यात येत आहे. आता इलेक्ट्रिक वाहनाच्या निर्मिती आणि वापरासही चालना देण्यात येत असून त्याअनुषंगाने इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!