Share

“चित्रपटाबद्दल तक्रार असेल तर…”; नागराज मंजुळेंचे टीकाकारांना उत्तर

Published On: 

मुंबई : ‘झुंड’ या सिनेमा विषयी अनेकांनी नागराज यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली. धनुष, आमिर खान सारख्या दिग्गज अभिनेत्याचेही नागराज यांचा हा सिनेमा पाहून डोळे पाणावले. अनेक मराठी कलाकारांनीही या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं. परंतु सोशल मीडियावर मात्र नागराज यांच्या या चित्रपटाच्या निमित्ताने खूप वाद होताना दिसत  आहेत .

काहींनी नागराज यांनी ‘झुंड’ मराठीत का केला नाही? असा सवाल केला. तर काहींनी नागराज केवळ वंचित घटकाचे चित्रपट बनवतात, अशा आशयाची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टीका केली. आता नागराज यांनी या टीकेला उत्तर दिलं आहे. एका  वाहिनीवर  दिलेल्या मुलाखतीत ते यावर बोलले. सोशल मीडियावरची टीका मी अजिबात गांभीर्यानं घेत नाही.कारण सोशल मीडियाला डोकं नसतं, चेहरा नसतो, असं ते म्हणाले.

https://www.instagram.com/p/CaYteK-IzNs/?utm_medium=copy_link

“सोशल मीडिया मला मशीनसारखा वाटतो. लोक अर्वाच्य भाषेत टीका करतात. माझ्या चित्रपटाबद्दल खरंच तक्रार असेल तर त्याने माझ्यासमोर येऊन बोलावं. चित्रपटात काही चुका असतील आणि त्या तुम्ही मला प्रत्यक्ष सांगितल्या तर मी माझे मुद्दे मांडू शकेल. मला जे काही सांगायचं होतं ते मी चित्रपटातून सांगितलं आहे. आता त्याला वेगळी पुरवणी जोडायची काय गरज आहे? शेवटी एकमेकांना समजून उमजूनच पुढे जावं लागणार आहे,’असं नागराज मंजुळे म्हणाले”.

आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. पहिल्या तीन दिवसात या चित्रपटाने 6.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!