नागपूर : कोरोनाचं जगभरात थैमान सुरु असताना भारतात देखील आता त्याचा कहर सुरु आहे. कोरोनाचा प्रसार होत असल्यानं केंद्र सरकारनं लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासोबत कोरोना विषाणूचे संक्रमण थांबण्यासाठी अनेक अटी व नियमांचं पालन देखील करण्यास सांगत होते. त्यामध्ये घराबाहेर पडताना मास्क वापरणे अनिवार्य आहे. असा एक नियम होता, परंतु अनेक लोक सरकारने व पोलिसांनी दिलेल्या या सुचनांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
‘अनलॉक १’मध्ये लोकांना बाहेर फिरण्यास जरी मुभा असली तरी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळणा जाणं आवश्यक आहे. हे सांगण्यासाठी काल ‘हाउज द डिस्टन्स’ या ट्विटसोबत मुंबई पोलिसांनी विकी कौशलचा चित्रपटातील फोटो पोस्ट केला आहे. मात्र या फोटोमध्ये त्याच्या तोंडाला मास्क असल्याचं पाहायला मिळत आहे. आता मास्कचे महत्व पटवून देण्यासाठी नागपूर पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी जेठालालच्या मिम्सचा वापर केला आहे.
नागपुर पोलिसांनी एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये जेठालाला आपल्या तोंडावर मास्क लावून बसलेला दिसत आहे. “तुम्ही गोकुळधाम सोसायटीमध्ये जा किंवा गडा इलेक्ट्रॉनिक्समध्ये मास्क वापरणे अनिवार्य आहे.” अशा आशयाची कॉमेंट या फोटोवर केली आहे.
Whether you are going to gokuldham society or gada electronics, please wear a Mask wherever you go.#NagpurPolice pic.twitter.com/PGGB9cziqg
— Nagpur City Police (@NagpurPolice) June 9, 2020
नागपुर पोलिसांचे हे अनोखे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. जेठालाला हे ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या प्रसिद्ध मालिकेतील एक लोकप्रिय पात्र आहे. “क्या तपलीक है आपको” या वाक्यासाठी जेठालाल प्रसिद्ध आहे. हेच वाक्य पोलिसांनी या ट्विटमध्ये वापरले आहे.
राजस्थानमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ; आजपासुन राज्याच्या सीमा बंद
मंत्रालयातील बैठकीला येताना मास्क न घालण्याचे राज ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले….
शाळा कधी सुरु होणार ? यावर ‘लवकरच निर्णय घेऊ’ – उपमुख्यमंत्री अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

