पुणे : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे.आता याचा परिणाम आता शैक्षिणक संस्थावर सुरु होताना दिसत आहे. जुनमध्ये नवे शैक्षिणक सुरु होत असते, शाळा सुरु होत असतात पण अजून त्या बाबत कोणताही ठोस निर्णय झाला नाही, पण आता यावर ‘लवकरच निर्णय घेऊ’, असे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत शनिवारी सांगितले.
भाजपा बिहार निवडणुकीचे रणशिंग फुंकणार ! अमित शाह यांची आज ऑनलाइन सभा
विभागीय आयुक्तालयात करोना आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी हे आदेश दिले. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता जपून आणि निश्चित कार्यपद्धती ठरवून शाळा कशा व केव्हा सुरू करता येतील, याचा निर्णय लवकरच घेऊ.” ‘टाळेबंदीमुळे विविध क्षेत्रांतील उद्योग, व्यवसाय यांचे नुकसान झाले आहे. उद्योगांना उभारी देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत आहेत. रोजगार उपलब्धतेसाठी उद्योग, व्यवसाय सुरू करून स्थानिकांना रोजगारात प्राधान्य द्यावे. यासाठी शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत रोजगार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न केले जातील.
कोरोनाच्या संकटात देखील राजकारण सुरूच, कॉंग्रेसवर आमदारांची लपवाछपवी करण्याची वेळ
तसेच करोनाच्या संकटकाळात काही खासगी रुग्णालयांकडून हलगर्जीपणा होत असून अशा रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी. या रुग्णालयांशी समन्वय ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करावेत, असे आदेशही पवार यांनी दिले. ससून रुग्णालयासाठी मनुष्यबळ तसेच तातडीच्या साधनसामग्रीच्या दृष्टीने मंत्रालयस्तरावर असलेल्या प्रस्तावांना मंजुरी देऊ. राज्य शासनाचा आवश्यक निधी तातडीने देण्यात येईल.’असे त्यांनी स्पष्ट केले.


