Share

राजस्थानमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ; आजपासुन राज्याच्या सीमा बंद

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : कोरोनाचं जगभरात थैमान सुरु असताना भारतात देखील आता त्याचा कहर सुरु आहे. कोरोनाचा प्रसार होत असल्यानं केंद्र सरकारनं लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला होता. अडीच महिन्यांचा लॉकडाउन शिथिल केल्यानंतर रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या काही आठवड्यात अनेक राज्यांमध्ये याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

याचा पाश्ववभूमीवर आता राजस्थान सरकारनं राज्यांच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी म्हणजे आजपासून इतर राज्यांशी जोडलेल्या सीमा एका आठवड्यासाठी बंद करण्यात आल्या आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ११ हजार ३६८ इतका झाला आहे. मागील २४ तासात राज्यात १२३ रुग्ण आढळून आले असून, वाढत्या रुग्ण संख्येला आणि कोरोनाच्या प्रसाराला रोखण्यासाठी राजस्थान सरकारनं हा निर्णय घेतला. राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत असे सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीवरून पीटीआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे.

राजस्थानमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. राजस्थानमध्ये आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू झाला आहे. जयपूरमध्ये आणखी ४० जणांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तर भारतपूरमध्ये ३४, सिकरमध्ये ११, झुनझुनमध्ये ९ यासह इतर जिल्ह्यातही रुग्ण आढळून आले आहेत. राजस्थानमध्ये सध्या २ हजार ६१० रुग्णांवर उपचार सुरू असून, ८ हजार १५२ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत.

मंत्रालयात अभ्यागतांना प्रवेश नाही; बायोमेट्रिक हजेरी प्रणालीही बंद

कोरोनामुळे राष्ट्रवादी-शिवसेनेची मोठी हानी, दोन शिलेदार गमावले

#corona : क्वारंटाइन केलेले लोक रात्री आपापल्या घरी जाऊन झोपतात : खा. विखे पाटील

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!