Share

मंत्रालयातील बैठकीला येताना मास्क न घालण्याचे राज ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले….

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात लॉकडाऊन असूनदेखील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यात मुंबईतील रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाबातच्या उपाययोजना तसंच लॉकडाऊनमध्ये सुरू असलेल्या शिथीलतेच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मंत्रालयामध्ये पोहचलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मास्क शिवाय दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालणे बंधनकारक असल्याचे मुंबई महानगरपालिकेने म्हटले होते. मात्र या नियमांचे आज राज यांच्याकडून उल्लंघन झाल्याचे पहायला मिळाले.

याच पार्श्वभूमीवर या बैठकीत आपण मांडलेल्या मुद्द्यांची माहिती राज ठाकरेंनी पत्रकारांना दिली. त्यावेळी तुम्ही फेस मास्क का लावला नाही, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर सगळ्यांनी मास्क घातलाय, म्हणून मी मास्क घातलेला नाही, असं उत्तर राज यांनी हसत हसत दिलं.

दरम्यान, राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेदेखील तिथे उपस्थित होते. या सगळ्यांनीच मास्क घालते होते. त्यामुळे राज यांनी मास्क का घातलेला नाही, याची चर्चा मंत्रालयात सुरू झाली. तसेच या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार, शेकापचे जयंत पाटील आदि नेते उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या 

शाहू महाराजांच्या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली दिलगिरी, म्हणाले…

#corona : सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे यांनी उपस्थित केले ‘हे’ महत्वाचे मुद्दे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!